- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
Meesho App काय आहे ?
मीशो हे भारतातील सर्वात
मोठे आणि सर्वात विश्वासार्ह Online Reselling App आहे. २०१५ मध्ये Meesho
App ची सुरुवात, विदित आत्रे आणि संजीव बर्नवाल
यांनी केली होती.
हे App महिला उद्योजक, गृहिणी, महाविद्यालयीन विद्यार्थी, दुकान मालक, सौंदर्यप्रसाधक, घाऊक व्यापारी किंवा पार्टटाइम नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या App च्या माध्यमातून आपण घर बसल्या एकही रुपया खर्च न करता, आपला ऑनलाईन व्यवसाय सुरु करून खूप चांगले पैसे कमावू शकतो.
Meesho App च्या माध्यमातून पैसे कसे मिळतात ?
या App च्या माध्यमातून
पैसे कमावण्यासाठी सर्वात आधी आपल्याला हे App आपल्या मोबईल मध्ये डाउनलोड करून घ्यायचे
आहे. त्यानंतर हे App ओपन करून त्यामध्ये आपले अकाउंट बनवायचे. Meesho वर अकाउंट बनवून
झाल्यावर आपल्याला या App मध्ये उपलब्ध असलेल्या फॅशन आणि एक्सेसरीज च्या वस्तूंचा
मोठा संग्रह दिसेल. आपण यामधून आपल्याला आणि आपल्या मित्र मैत्रिणींना आवडतील असे प्रॉडक्ट
सिलेक्ट करायचे आहेत आणि ते प्रॉडक्ट्स आपल्या Whatsapp, Facebook, Instagram सारख्या
Social Media App च्या माध्यमातून आपल्या Contact मध्ये असलेल्या लोकांना शेअर करायचे
आहेत.
त्यानंतर जेंव्हा कुणाला
तुम्ही शेअर केलेला एखादा प्रॉडक्ट आवडेल आणि त्याला तो खरेदी करायचा असेल, तेंव्हा
आपण त्या प्रॉडक्ट च्या मूळ किंमतीमध्ये, तो प्रॉडक्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी
लागणार शिपिंग चार्ज आणि आपला फायदा या दोन गोष्टी मिळवून त्याची किंमत आपल्या कस्टमरला
शेअर करायची आहे. जेंव्हा आपला कस्टमर ऑर्डर फिक्स करेल, तेंव्हा आपल्याकडे पेमेंट
करण्यासाठी दोन पर्याय असतात.
२) COD म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on Delivery)
ऑनलाईन पेमेंट (Online Payment)
आपल्याला जर ऑनलाईन
पेमेंट करायचे असेल तेंव्हा आपल्याला आपल्या कस्टमर कडून त्या प्रॉडक्टचे पैसे (मूळ किमंत + शिपिंग चार्ज + आपला फायदा) आधी घ्यायचे
आहेत. आणि नंतर App वर जाऊन ऑर्डर प्लेस करून आपल्या अकाउंट मधून ऑनलाईन पेमेंट
करायचे आहे.
कॅश ऑन डिलिव्हरी (Cash on Delivery)
आणि जर आपल्या कस्टमरने COD चा पर्याय निवडला तर जेंव्हा त्यांचे प्रॉडक्ट त्यांना त्यांच्या घरी पोहोच होईल तेंव्हा ते Meesho च्या लॉजिस्टिक पार्टनर (Logistic Partner) ला प्रॉडक्ट डिलिव्हरी च्या वेळी पैसे देतील. आणि जेंव्हा ते पेमेंट Meesho कडे जमा होईल तेंव्हा तुमचे कमिशन तुमच्या खात्यामध्ये काही दिवसात जमा होईल.
Meesho App वर प्रॉडक्ट खरेदी करण्याचे फायदे.
- कमी किंमतीत लोकप्रिय आणि दर्जेदार उत्पादने
- सुलभ रिटर्न पॉलिसीसह उत्कृष्ट गुणवत्ता
- संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी
- ऑनलाईन आणि सीओडी (कॅश ऑन डिलिव्हरी) पेमेंट
Meesho App डाउनलोड कसे कराल?
हे App आपण GooglePlay Store वरून डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल मध्ये Play Store ओपन केल्यानंतर
Search Box मध्ये Meesho App टाईप करा. त्यानंतर आपल्याला Meesho App दिसेल. त्यावर
Click करून Install करायचे आहे. App Install झाल्यानंतर ते ओपन करून त्यामध्ये विचारलेली
माहिती भरून आपलं Registration करायचे आहे. जर तुम्ही Meesho App Install करू इच्छित
असाल तर इथून डाउनलोड करा.
Download : Download Meesho App
Meesho वर Reselling करणे म्हणजे काय?
मीशो बरोबर Reselling करणे म्हणजे एकही रुपया न गुंतवता आपला स्वतःचा व्यवसाय चालू करण्याचा एक मार्ग आहे. जेंव्हा आपण या App वर Reseller म्हणून रेजिस्ट्रेशन करतो तेंव्हा आपल्याला App वर उपलब्ध असलेले उत्पादने आपल्या नेटवर्कद्वारे किंवा सोशल मीडियावर शेअर करून विकण्याची संधी मिळते. आणि त्या प्रत्येक विक्रीसह नफा कमविता येतो. या App वर 1 लाखा पेक्षा अधिक दर्जेदार उत्पादने आहेत. ही उत्पादने तुमच्या ग्राहकांपर्यंत त्या उत्पादनांच्या सप्लायर्स कडून पुरविल्या जातात, ज्यांनी त्यांचा व्यवसाय मीशोबरोबर Tie -Up केलेला आहे. मीशो बरोबर Reselling करणे हा घरातून काम करण्याचा आणि नफा कमावण्याचा एक खूप सोपा मार्ग आहे.
Meesho च्या उत्पादनांची गुणवत्ता
Meesho त्यांच्याकडे असलेल्या उत्पादनांची गुणवत्ता काटेकोर पणे तपासून घेते. आपल्यासोबत केवळ उच्च-गुणवत्तेच्या सप्लायर काम करतील याची खात्री करुन घेतात. त्याचबरोबर Meesho वर ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे प्रॉडक्ट मिळावेत यासाठी सुलभ रिटर्न आणि एक्सचेंज धोरण प्रदान केले आहे. पुढे, प्रॉडक्ट डिलिव्हरी नंतर, प्रॉडक्टच्या गुणवत्तेवर, सक्रियपणे वापरकर्त्याचा फीडबॅक घेतला जातो. त्याचबरोबर प्रॉडक्ट डिटेल पेज वर असलेल्या रेटिंग्स आणि रिव्हिव वरून सुद्धा प्रॉडक्टच्या क्वालिटी संबंधी वापरकर्त्याचा फीडबॅक घेतला जातो. आणि या फीडबॅकच्या मदतीने खराब व कमी दर्जाचे प्रॉडक्ट सप्लायर्सना Meesho मधून वगळण्यात येते.
Meesho आपल्याला Reselling करण्यासाठी कश्या प्रकारे मदत करते?
- Meesho केवळ नामांकित सप्लायर बरोबर व्यवसाय करून आपल्याला उच्च-गुणवत्तेची उत्पादने प्रदान करतात.
- बाजारातील नवीनतम ट्रेंडसह Reseller ला ‘For You’ Section च्या माध्यमातून नियमितपणे Update केले जाते. हा Section नवनवीन Fashion Wear सह दररोज Update केला जातो.
- Meesho शिपिंग आणि वितरण याची जबाबदारी घेते. त्यांचे विश्वसनीय Logistic Partner संपूर्ण भारतात प्रॉडक्टची डिलिव्हरी करतात. त्यामुळे आपल्याला Product Delivery चि काळजी करण्याची काही गरज नाही.
- त्याचबरोबर आपल्याला ग्राहकांची संख्या वाढावी आणि त्यांचा आपल्यावर विश्वास निर्माण होण्यासाठी " कॅश ऑन डिलिव्हरी " (Cash on Delivery) हा पर्याय उपलब्ध केला आहे.
- सुलभ आणि त्रास-मुक्त रिटर्न आणि एक्सचेंज. एखाद्या ग्राहकास एखादे उत्पादन न आवडल्यास आणि ते बदलायचे किंवा परत करायचे असल्यास त्याची पूर्ण जबाबदारी मीशो घेते, तेही विनामूल्य.
- Meesho Business Academy च्या मदतीने आपण Content किंवा Videos च्या साहाय्याने Reselling बाबत साऱ्या गोष्टींची माहिती मिळवू शकतो आणि आपला Business चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो.
- त्यांची मेहनती आणि प्रशिक्षित कस्टमर सपोर्ट टीम आपल्या समस्यांचे समाधान पुरवण्यासाठी कायम तत्पर असते. आपण त्यांना Email द्वारे किंवा त्यांना Call करून त्यांच्याशी संपर्क साधू शकतो.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा