How to start a Job Consultancy : जॉब कन्सल्टन्सी बिजनेस कसा सुरु करायचा.

What is Job Consultancy : जॉब कन्सल्टन्सी म्हणजे काय?

जॉब कन्सल्टन्सी हा भारतातील फायद्याचा व्यवसाय आहे. प्लेसमेंट कन्सल्टन्सीला आपल्या देशात नेहमीच मागणी राहिली आहे आणि दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आपण भारतात जॉब कन्सल्टन्सी कंपनी किंवा एजन्सी सुरू करण्याच्या विचारात असाल तर हा लेख आपल्याला नक्कीच मदत करेल. 

जॉब कन्सल्टन्सी किंवा रिक्र्यूटमेंट एजन्सी हा एक असा व्यवसाय आहे जो बेरोजगारांना काम शोधण्यात मदत करतो. जॉब कन्सल्टन्सी एजन्सी वेगवेगळ्या कंपन्यांच्या मालकांना कंत्राटी किंवा कायमस्वरूपी नोकरीसाठी किंवा उपलब्ध पदांसाठी पात्र कामगार देऊन सेवा प्रदान करते. फ्रेशर किंवा अनुभवी लोकांच्या मागील कामाच्या अनुभवावर आणि कौशल्यांवर आधारित, योग्य नोकरी शोधणार्‍या उमेदवारांसाठी जॉब प्लेसमेंट एजन्सी काम करते. 

ही एजन्सी नोकरी शोधणाऱ्या आणि नोकरी देणाऱ्यांच्या मधील एक दुवा किंवा मध्यस्ती म्हणून काम करते. 

How Job Consultancy Works? जॉब कन्सल्टन्सी कसे काम करते?

१. जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब साठी रिक्वायरमेंट असेल तर ती कंपनी जॉब कन्सल्टन्सी एजन्सीला संपर्क साधते 

२. तसेच जर एखादा व्यक्ती नोकरीच्या शोधात असेल तर तो हि जॉब कन्सल्टन्सी एजन्सीला संपर्क साधू शकतो. त्यानंतर कन्सल्टन्सी एजन्सीत्या व्यक्तीची लागणारी पूर्ण माहिती जसे, त्याचे शिक्षण, अनुभव, व इतर काही गोष्टींची माहिती घेऊन त्याच्या नावाची नोंदणी करते. व त्याचा इच्छेनुसार व योग्यतेनुसार जर एखाद्या कंपनीमध्ये पद भरायचे असेल तर त्या व्यक्तीला संपर्क साधून कळवते. 

३. याचबरोबर काहीवेळा कन्सल्टन्सी एजन्सी स्वतःहून काही कंपन्यांच्या HR डिपार्टमेंट ला संपर्क करून रिक्त पदांविषयी माहिती घेते. व मिळालेल्या माहितीच्या आधारे योग्य व पात्र असलेल्या उमेदवारांना त्याची कल्पना देते. 

How does Job Consultancy Agency make money? जॉब कन्सल्टन्सी एजन्सीमध्ये पैसे कसे मिळतात?

वेगवेगळ्या जॉब कन्सल्टन्सी एजन्सीची पैसे कमावण्याची पध्दत वेगवेगळी असू शकते. 


बऱ्याच एजन्सीज मध्ये जेंव्हा सुरुवातीला उमेदवार आपले नवं नोंदवतो तेंव्हा त्याच्याकडून रेजिस्ट्रेशन फी (Registration Fee) घेतली जाते. आणि नंतर जेंव्हा त्या उमेदवाराला एजन्सीने सुचविलेल्या कंपनी मध्ये नोकरी लागते तेंव्हा त्याला मिळणाऱ्या पगाराच्या ठराविक टक्के रक्कम ही कमिशन म्हणून घेतली जाते. याची कल्पना त्या उमेदवाराला, त्याची त्या एजन्सीमध्ये नोंदणी करताना दिलेली असते. ही टक्केवारी प्रत्येक एजन्सीची वेगवेगळी असू शकते. 

कमिशनची टक्केवारी या गोष्टींवर अवलंबून असते.

१. उमेदवाराला कोणत्या प्रकारच्या कंपनीमध्ये नोकरी मिळत आहे. 

२. कोणत्या पदाकरिता. 

३. उमेदवाराला मिळणारा वार्षिक पगार (Annual Salary / CTC ) 

४. कोणत्या प्रकारची नोकरी आहे (Permanent / Temporary) 

काही एजन्सी, कंपनी (ज्यामध्ये उमेदवाराला नोकरी मिळणार आहे) आणि ज्याला नोकरी मिळणार आहे अश्या उमेदवारांकडून म्हणजेच दोघांकडून हि कमिशन घेतात. 

तर काही एजन्सी, फक्त कंपनीकडून कमिशन घेतात. उमेदवारांकडून कमिशन घेत नाहीत. 

चला तर मग आता आपण स्टेप बाय स्टेप बघुयात कि एजन्सी सुरु करण्याकरीता आपल्याला काय करावे लागेल : Steps to Start Job Consultancy Agency. 

आता जर आपल्याला जॉब कन्सल्टन्सी एजन्सी (Job Consultancy Agency) सुरू करायची असेल तर आपल्याला त्याचे मूलभूत कार्य कसे चालते, तसेच या कार्यात आवश्यक असणारी सामान्य माहिती, आवश्यक असणाऱ्या गोष्टी, मार्केटमधील स्पर्धा, इत्यादी समजून घेणे आवश्यक आहे. या सर्व प्रकारच्या माहितीचा अभ्यास करून, आपल्याला जॉब कन्सल्टन्सी बिजनेस सुरू करण्यास किती खर्च येईल आणि आपल्याला किती नफा मिळेल याचा अंदाज आपण स्वतः घेऊ शकतो. 

लक्षात घ्या की जॉब कन्सल्टन्सी एजन्सी किंवा कंपनी कशी सुरु करावी यासंबंधीची पुढे दिलेली माहिती हि केवळ स्वतंत्र जॉब सल्लागार किंवा लहान व नवीन जॉब कन्सल्टन्सीला अनुसरण दिलेली आहे, मोठ्या जॉब कन्सल्टन्सी कंपन्यांकरिता नाही, याची कृपया नोंद घ्यावी. 

१. Choose your Sector to work for : आपल्या सोयीचे क्षेत्र निवडावे 

सुरुवातीला आपण आपल्या एजन्सीसाठी आपल्या सोयीचे एखादे क्षेत्र निवडावे. जसे, 

आय.टी. क्षेत्र : I.T. Sector 

बँकिंग व फायनान्स: Banking and Finance 

मार्केटिंग: Marketing 

शिक्षण क्षेत्र : Teaching 

सिव्हिल कन्स्ट्रक्शन. इत्यादी : Civil Construction 

सुरवातीला फक्त एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून कामाला सुरुवात केल्याने आपल्याला त्याचा खूप फायदा होतो. नंतर जसजसा आपला बिजनेस वाढत जाईल आणि मार्केटमध्ये आपल्या एजन्सीचे नाव होईल तेंव्हा हळूहळू आपण इतर क्षेत्रांमध्येही आपले काम सुरु करू शकता. 

2. Market and Competitor Research : मार्केट आणि प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास  

मार्केट आणि प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास करताना आपल्याला खाली दिलेल्या गोष्टी करायच्या आहेत. 
१. सर्वप्रथम आपल्याला हे शोधायचे आहे कि मार्केट मध्ये आपण निवडलेल्या क्षेत्रामधल्या कोणकोणत्या कंपन्या आहेत. त्याची एक यादी तयार करायची आहे. त्या कंपन्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या उमेदवारांची जास्त गरज भासते?. त्यासाठी उमेदवारांकडे कोणत्या प्रकारचे शिक्षण असले पाहिजे? वर्षाला किती उमेदवारांची नियुक्ती केली जाऊ शकते? इत्यादी. अश्या प्रकारची सर्व माहिती आपल्याकडे असणे आपल्या व्यवसायासाठी फायद्याचे ठरेल. 

२. आपण कन्सल्टन्सी एजन्सी सुरु कारण्यापूर्वीही मार्केट मध्ये बऱ्याच एजन्सी असतील ज्या बऱ्याच वर्षांपासून हे काम करत आहेत. ह्या एजन्सीज अर्थातच आपल्या प्रतिस्पर्धी आहेत. तर अशा या आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांचीही माहिती आपल्याकडे असणे गरजेचे आहे. जसे त्यांची काम करण्याची पध्दत, त्यांचे कमिशन स्ट्रक्चर, त्यांची मार्केटिंग आणि प्रोमोशन करण्याची पध्दत. इत्यादी. 

३. वरील दोन गोष्टी केल्यानंतर आपल्याला आपल्या कामाची स्ट्रॅटेजि ठरवायची आहे. वरील माहितीच्या अनुशंघाने आपण आपली कामाची पध्दत अशी आखायची आहे की जेणेकरून आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देऊ शकू. 

3.  Choose the perfect location for your Office. आपल्या ऑफिससाठी योग्य लोकेशनची निवड करा.

आपल्या ऑफिससाठी लोकेशनची निवड करताना असे लोकेशन निवडायचे आहे जिथे उमेदवार शोधणे फार कठीण होणार नाही. म्हणजे आपल्याला असे लोकेशन निवडायचे आहे जिथे भरपूर कंपन्या असतील जसे कि MIDC च्या जवळ आणि जिथे जास्त लोकांची वर्दळ असावी. कन्सल्टन्सी ऑफिस मध्ये साधारणपणे जास्त लोकांची ये जा नसते कारण बरेचसे काम फोन किंवा ई-मेल द्वारा होत असते. त्यामुळे ऑफिस आणि फर्निचरवर जास्त खर्च करण्याची गरज नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की फक्त एक खुर्ची आणि टेबल असला तरी चालेल. ऑफिस छान आणि प्रसन्न वाटले पाहिजे पण झगमगाट नसला तरी चालेल. 

4. Decide a name for your Job Consultancy Business : आपल्या व्यवसायाचे किंवा एजन्सीचे नाव ठरवणे.

आजच्या या डिजिटल जगात जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या व्यवसायासाठी वेबसाइट असणे खूप महत्वाचे झाले आहे.पूर्वी लोक आधी व्यवसायाचे नाव ठरवत असत की ते नोंदणीकृत करून घेतल्यानंतर त्या नावाने व्यवसायासाठी डोमेन नेम विकत घेऊन वेबसाइट तयार करत असत. आता ही प्रक्रिया बदलली आहे, आता व्यावसायिकांना प्रथम योग्य डोमेन नावाची उपलब्धता तपासावी लागते आणि नंतर त्यानुसार व्यवसायाची नोंदणी करावी लागते. 

म्हणून आता पहिल्यांदा एक आकर्षक आणि व्यावसायिक डोमेन नावाची उपलब्धता शोधा, .com ला प्राधान्य द्या आणि एक सोपी पण व्यावसायिक वेबसाइट बनवा. आणि त्यानंतर त्या नावाने आपला व्यवसाय सुरु करा. आपल्या वेबसाइटवर एक असा फॉर्म असावा जिथे उमेदवार आणि क्लायंट त्यांची माहिती सबमिट करू शकतील. अशा रीतीने आपण आपल्या व्यवसायासाठी एक आकर्षक आणि सोपे नाव ठेवावे. 

5. Business Registration : व्यवसाय नोंदणी

व्यवसाय नोंदणी ही आपल्या संस्थेच्या संरचनेवर (Organisation Structure) अवलंबून असते. यामध्ये चार प्रकार आहेत. 

१. प्रोप्रायटरशिप (Sole proprietorship) 

२. पार्टनरशिप (Partnership) 

३. प्रायव्हेट लिमिटेड (Private Limited) 

४. पब्लिक लिमिटेड (Public Limited) 

आणि जर तुम्ही भारताबाहेर पण काम करू इच्छित असाल तर तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ ओव्हरसीज इंडियन अफेअर्स (ministry of overseas Indian affairs) चे लायसन्स घेणे गरजेचे आहे. 

आपल्या व्यवसायाच्या प्रकारानुसार आपल्याला व्यवसाय नोंदणी करून घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही एखाद्या वकिलाची किंवा चार्टर्ड अकाउंटंट ची मदत घेऊ शकता. त्यांचा सल्ला घेऊन सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात. 

6. Bank Account and Insurance : बँक अकाउंट आणि इन्शुरन्स

आपल्या एजन्सीच्या नावाने बँकेमध्ये एक खाते उघडावे ज्यामध्ये आपल्या व्यवसायाशी निगडित सर्व आर्थिक देवाण घेवाण करणार आहोत. त्याच बरोबर आपल्या एजन्सीचा विमा करून घेणे पण गरजेचे आहे जेणेकरून जर आपल्याला छोटे मोठे नुकसान झाल्यास आपण त्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करू शकू. आणि आपले आर्थिक नुकसान टाळू शकू. 

7. Build a Professional Team : एक चांगली टीम बनवा 

ही स्टेप खूप महत्वाची आहे कारण कोणत्याही व्यवसायाच्या वृद्धीसाठी आपल्याकडे एक प्रोफेशनल लोकांची प्रभावी टीम असणे खूप महत्वाचे असते. आपल्या टीम मध्ये अनुभवी आणि विना अनुभवी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांची गरज असते. 



अनुभवी लोक्कांना आपल्याला जास्त पगार द्यावा लागेल तिथेच नवीन व शिकाऊ लोकं कमी पगारात काम करायला तयार असतात. त्यामुळे प्रत्येक कामाच्या मागणी नुसार आपल्याला या दोघांमधील निवड करायची आहे. 

आपल्याला जर या कामाचा अनुभव असेल तर आपण सुरुवातीला कमी अनुभव किंवा विना अनुभवी लोकांपासून व्यवसायाला सुरुवात करू शकतो. पण जर आपल्याला या कामाचा जास्त अनुभव नसेल तर आपल्याला अनुभवी लोकांची गरज लागणार आहे. 

अश्या प्रकारे आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. 

8. एकदा व्यवसाय सुरु झाल्यावर नंतर कश्या प्रकारे काम करायचे आहे ते पुढे थोडक्यात सांगितले आहे.

आपण ज्या क्षेत्राचा कंपनीमध्ये प्लेसमेंट प्रधान करणार आहेत त्या क्षेत्रातल्या सर्व छोट्या मोठ्या कंपन्यांची एक यादी तयार करावी. त्या यादीमध्ये खाली दिलेल्या गोष्टींचा समेवश असावा. 

१. कंपनीचे नाव 

२. पत्ता 

३. HR डिपार्टमेंटचा ई-मेल 

४. फोन नंबर 

त्यानंतर त्या सर्व कंपन्यांच्या HR मॅनेजरशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधावा आणि त्यांना तुमच्या व्यवसाविषयी माहिती द्यावी व तुमची एजन्सी त्यांना कशाप्रकारे मदत करू शकते हे त्यांना आत्मविश्वासाने समजून सांगावे. 

त्यानंतर फोन वरून किंवा ई-मेल द्वारे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी एक चांगले रिलेशन तयार करा. चांगले रिलेशन तयार झाल्यामुळे जेंव्हा कधी त्यांच्या कंपनी मध्ये एखाद्या पदासाठी जागा भरायची असेल तेंव्हा ते नक्की तुमच्याशी संपर्क साधतील. 

तसेच आपले उमेदवार ज्या कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला बिजनेस मिळू शकतो. 

9. Job Portal Subscription : जॉब पोर्टलवर सब्स्क्रिप्शन करणे.

त्याचबरोबर आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपले क्लायंट शोधण्यासाठी इंटरनेटचाही वापर करू शकतो. इंटरनेटवर आपल्याला असे बरेच जॉब पोर्टल पाहायला मिळतील जिथे आपण आपल्याकडे असलेली वॅकन्सी/रिक्त जागा (Vaccant Post) पोस्ट किंवा अपलोड करू शकतो जसे कि, Nuakri.com, Shine, Monster. पण या सर्वांचा एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे यांचे सुब्स्क्रिप्शन चार्जेस जास्त आहेत. आणि या सगळ्यांचे पोर्टल एकाचवेळी विकत घेणे नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्यांना कधी काही नाही परवडू शकत. म्हणून तुम्हाला जमत असेल आणि तुमचा ज्या पोर्टल वर जास्त विश्वास आणि अनुभव आहे, असे एखादे पोर्टल घेऊन तुमच्या कामाची सुरुवात करावी. व नंतर एकदा तुमचा बुसीन्सस चांगला सेट झाला कि पोर्टल ची संख्या वाढवावी. या पोर्टल्स सोबतच इंटरनेटवर बरेच फ्री पोर्टल्स पण आहेत. मला वाटते तुम्ही त्यांचाही वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्ही Linkedin चा पण वापर करू शकता. 

10.  Marketing / Promoting your Job Consultancy Business : आपल्या जॉब कन्सल्टन्सी बिजनेसचे मार्केटिंग करणे.

मार्केटमध्ये जर एखाद्या कंपनीला जर कामगारांची भर्ती करायची असते तेंव्हा ती कंपनी अश्या जॉब कन्सल्टन्सी कडे पळते ज्यांच्याकडे उमेदवारांची खूप मोठी उपलब्धता असते. कारण जेवढे जास्त उमेदवार असतील तेवढेच जास्त ऑपशन त्यांना मिळतात. 

आणि म्हणून आपल्याकडे जास्तीजास्त उमेदवारांनी नाव नोंदणी करावी यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आता प्रयत्न करायचे म्हणजे काय करायचे तर जास्तीजास्त लोकांपर्यंत आपल्या जॉब कन्सल्टन्सी एजन्सीचे नाव पोहचले पाहिजे आणि त्यांना आपण त्यांची कश्या प्रकारे मदत करू शकतो हे त्यांना कळाले पाहिजे. त्यासाठी आपल्या बिजनेसची जाहिरात करणे खूप गरजेचे आहे. 

निष्कर्ष :

जॉब कन्सल्टन्सी बिजनेस हा एक खुप चांगला बिजनेस आहे. आपण हा बिजनेस सुरु करून कंपनी जिला कामगार हवे आहेत आणि उमेदवार जे नोकरीच्या शोधात आहेत अश्या दोन्ही लोकांना मदत करत आहोत. कारण नोकर भर्ती करणे आणि नोकरी शोधणे ही खूप त्रासदायक आणि वेळखाऊ प्रोसेस आहे. आपण ह्या दोघांच्या मधला दुवा बनून दोघांचा त्रास आणि वेळ वाचवतो. 

त्याचबरोबर मार्केटमध्ये असे बरेच लोक आहेत जे लोकांना नोकरी देण्याच्या नावाखाली त्यांची फसवणूक करत आहे. त्यामुळे आपण आपल्या उमेदवारांना नोकरी मिळवून देऊन अश्या लोकांपासून वाचवू शकतो. 

हा व्यवसाय आपल्याला चांगला पैसा कमवून देतो. फक्त आपल्याला हा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि सगळ्या कायदेशीर बाबींचा पूर्तता करून करायचा आहे. जे उमेदवार आपल्याकडे येतात ते त्यांना नोकरी मिळावी आणि त्यांचे त्यावर घर चालावे म्हणून येतात हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे त्यांची फसवणूक होऊ नये याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. कोणताही व्यवसाय जर प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केला तर त्यात यश हे मिळतेच. 

तुम्हाला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्या. Best of Luck.

टिप्पण्या