- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सामान्यपणे आपल्या मराठी घरांमध्ये व्यवसायापेक्षा नोकरीला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मराठी समुदायात उद्योजकांपेक्षा नोकरदारांचे प्रमाण तुलनेने बरेच जास्त आढळते. याची बरीच करणं असू शकतात, त्या मध्ये कोणता व्यवसाय करणे आपल्याला शक्य आहे. एखादा व्यवसाय कसा सुरु करायचा याची कल्पना नसणे. व्यवसायाच्या फायद्यांची कल्पना नसणे, व्यावसायिक मानसिकता नसणे, व्यवसाय करण्यास प्रोत्साहन न मिळणे. अशी करणे असू शकतात.
त्यामुळे आपल्या मराठी मुलांनी नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग सुरु करावेत या विचारातून apalabusiness या ब्लॉग ची सुरुवात करत आहे. या मध्ये आम्ही नवनवीन व्यवसायांची माहिती, तो कसा करावा, त्यात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे, याची माहिती देणार आहोत. तसेच जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांच्याबद्दलही माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत.
आम्ही नोकरीच्या विरोधात नाही पण जे लोक इच्छा नसतानाही नोकरी करत आहेत व ज्यांना उद्योजक व्हायची इच्छा आहे पण मार्ग सापडत नाही अशा लोकांची मदत करणे हाच आमचा उद्देश आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा