How to make money on Youtube (Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात)

How to make money on Youtube (Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात)    

 आजकाल सर्वजण पैसे कमावण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधात आहेत. त्यामध्ये घरबसल्या Online पद्धतीने पैसे कसे कमवू शकतो याच्यावर बऱ्याच जणांचा भर आहे. Online पद्धतीने पैसे कमविण्यासाठी बरेच पर्याय आहेत. त्यामध्ये सगळ्यात सोपा आणि चांगला पर्याय  म्हणजे Youtube Channel तयार करून पैसे कमावणे हा आहे.

    आज आम्ही तुम्हाला Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात याची पूर्ण आणि सविस्तर माहिती देणार आहोत. त्यासाठी काय तयारी केली पाहिजे, तुमच्याकडे कोणत्या गोष्टींची गरज आहे, कोण कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे सगळं सांगणार आहोत.

Youtube वर कोण कोणत्या प्रकारे पैसे कमावू शकता. Ways to earn Money on Youtube.

१) Youtube Partner Program / Advertising revenue : Youtube पार्टनर प्रोग्रॅम

२) Merchandise Shelf : मर्चंडायज शेल्फ

३) Channel memberships : चॅनेल मेम्बरशिप

४) Super Chat & Super Stickers : सुपर चॅट आणि सुपर स्टिकर

५) YouTube Premium Revenue : Youtube प्रीमियम रेव्हिन्यू

६) Affiliate Marketing : अफिलिएट मार्केटिंग

७) Promoting your own Product or Service. : आपल्या वस्तूंची / सेवांची जाहिरात 


1) Youtube Partner Program / Advertising revenue ( Youtube पार्टनर प्रोग्रॅम )

    Youtube Partner Program च्या माध्यमातून, Youtube मार्फत तुमच्या Videos वर जाहिराती (Advertisements) दाखवल्या जातात. त्या जाहिराती दाखवण्यासाठी Youtube जाहिरातदारांकडून पैसे घेते. आणि त्यामधला काही हिस्सा तुम्हाला देते. अशा प्रकारे पैसे कमविण्यासाठी, आपल्याला Youtube Partner Program Join करावे लागते.

पात्रता : Youtube Partner Program Join करण्यासाठी पात्रता आहे कि

१) आपल्या Youtube Channel चे एक वर्ष्याच्या कालावधीमध्ये 1000 Subscribers झाले पाहिजेत. आणि

२) त्याच कालावधीमध्ये आपल्या Videos वर कमीतकमी 4000 तासांचा Watchtime आला पाहिजे. म्हणजे आपले सगळे व्हिडिओस मिळून 4000 तास लोकांकडून बघितले गेले पाहिजेत.

हा टप्पा जर आपल्याला एका वर्षाच्या कालावधीमध्ये गाठता आला तर आपण Youtube Partner Program Join करण्यास पात्र होतो.

 

2) Merchandise Shelf ( मर्चंडायज शेल्फ )

    Youtube ने Teespring बरोबर Partnership केली आहे. Teespring ही एक E-commerce website आहे जी Customized Products ची विक्री करण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. Youtube आपल्याला अशा २० पेक्षा जास्त Customized Product ची विक्री करण्याची संधी देते.

    Youtube Merchandising मध्ये Teespring चे काही प्रॉडक्ट्स आहेत जसे टी शर्ट, मग, इत्यादी. ते आपण आपल्याला हवे तसे Customise करायचे, त्याच्यावर तुम्ही तुम्हला पाहिजे तसे फोटो किंवा Text Add करू शकता.

    आणि नंतर तुम्ही सेट केलेले Products तुमच्या video च्या खाली दिसू लागतात. जर तुमच्या प्रेक्षकांना तुमचे हे Products आवडले तर ते तुमचे हे Products विकत घेतात.

    या मध्ये तुमच्या आवडी प्रमाणे Products Design करणे, जी लोकं Order करतील त्यांची Order घेणे, त्यांना ते Products पाठवणे, इत्यादी, हि सर्व कामे Teespring Company करणार आहे. यात तुम्हाला काहीच करायचे नाही. ते Product विकल्यानंतर तुम्हाला त्याचे कमिशन मिळणार आहे.

पात्रता : 

१ ) तुमच्या Youtube Channel वर कमीतकमी  १०००० ( दहा हजार ) Subsribers पाहिजेत.

२ ) तुमचा Channel, Youtube Partner Program शी Join केलेला असला पाहिजे.

 

3) Youtube Channel Membership ( चॅनेल मेम्बरशिप )

    Youtube Channel Membership मध्ये तुमचे तुम्ही तुमच्या प्रेक्षकांना तुमच्या चॅनेलची Membership देऊ शकता. Membership घेण्यासाठी त्यांना Youtube ला दर महिन्याला काही पैसे भरावे लागतात. त्यामधून Youtube साधारण ३० टक्के रक्कम स्वतःकडे ठेवते आणि राहिलेले ७० टक्के तुमच्या Account वर जमा करते.

    जेंव्हा तुमचा Youtube Channel  Membership देण्यासाठी पात्र होतो, तेंव्हा तुम्ही तुमच्या Members साठी खास Perk देऊ शकता. म्हणजे तुम्ही त्यांना खास ट्रीटमेंट देऊ शकता जे फक्त Paid Members साठीच असतील. जसे की जर तुमचा channel एखाद्या विषयाच्या Training चा असेल तर तुम्ही तुमच्या Paid Members साठी खास Live Streaming करून Training घेऊ शकता.

पात्रता : 

१ ) तुमच्या Youtube Channel वर कमीतकमी  १००००० ( एक लाख ) Subsribers पाहिजेत.

२ ) तुमचा Channel, Youtube Partner Program शी Join केलेला असला पाहिजे.

 

4) Super Chat & Super Stickers ( सुपर चॅट आणि सुपर स्टिकर )

    जेंव्हा तुम्ही Monetisation साठी पात्र होता, तेंव्हा तुम्हाला Super Chat & Super Stickers मधून पैसे कमावण्याची संधी मिळते. आता हे Super Chat & Super Stickers काय आहे हे समजून घेऊया.

    जेंव्हा तुम्ही तुमचा Live Video तयार करता म्हणजेच Live Streaming च्या वेळी तुमचे फॅन्स तुमच्याशी chatting करतात किंवा तुम्हाला stickers पाठवतात. पण जर तुमच्या फॅन्सची संख्या जास्त असेल तर chatting च्या दरम्यान chats खूप Fast Scroll होतात, त्यामुळे आपल्याला ते chats वाचायला पुरेसा वेळ मिळत नाही. मग जर एखाद्या तुमच्या फॅनला त्याचा Message तुम्हाला दाखवायचा असेल किंवा त्याला तुम्हाला काही विचारायचे असेल तर तो SuperChat विकत घेतो. त्यामुळे त्याचा message Highlight होतो आणि त्यांनी जितक्या वेळेचा Message विकत घेतला आहे तितका वेळ तो आपल्याला दिसतो. तसेच Super Sticker च्या बाबतीत आहे.


पात्रता : 

१ ) तुमचा Youtube Channel Monetized असला पाहिजे.

२) तुम्ही त्या देशामध्ये राहात असला पाहिजे ज्या देशामध्ये Super Chat & Super Stickers available  आहे.

 

5) YouTube Premium Revenue ( Youtube प्रीमियम रेव्हिन्यू )

            या प्रकारामध्ये जेंव्हा तुमचे Video असे लोकं बघतील ज्यांनी Youtube Premium On केले असेल तेंव्हा तुम्हाला पैसे मिळू शकतात. Youtube Premium On केल्यानंतर आपल्याला Video बघताना कोणतेही Advertisement दिसत नाहीत पण त्यासाठी आपल्याला दर महिन्याला Youtube ला थोडे पैसे द्यावे लागतात. म्हणून जर तुमचा विडिओ अशा लोकांनी बघितला तर त्यातले काही पैसे youtube तुमच्या Account वर जमा करते.


पात्रता : १ ) तुमचा Youtube Channel Monetized असला पाहिजे.

२) अशा प्रकारचे Content बनवणे जे Youtube Premium Scubscriber नी पाहिला पाहिजे.


6) Affiliate Marketing ( अफिलिएट मार्केटिंग )

    Affiliate Marketing  म्हणजे इतर लोकांच्या (किंवा कंपनीच्या) उत्पादनांचा प्रचार करून कमिशन मिळविण्याची प्रक्रिया. आपल्याला Amazon, Flipkart, eBay सारख्या E-commerce website माहीतच आहेत. या website वर बरेचसे Product विक्रीसाठी असतात. लोक या website वरून बरचसे सामान खरेदी करतात. आपल्याला जर Affiliate Marketing मधून पैसे कमवायचे असतील तर पहिल्यांदा आपल्याला या कंपनीचे Affiliate बनावे लागेल. त्यासाठी आपल्याला त्यांच्या website ला visit करून Affiliate बनण्यासाठी registration करायचे आहे. नंतर आपल्याला जे Product आवडेल आणि जे आपल्या Youtube Channel शी निगडित असेल असे Product सिलेक्ट करून आपल्या Youtube Channel वर त्याची जाहिरात दाखवायची.


    जर कोणी तुमच्या जाहिरातीवर Clik करून ती किंवा एखादी दुसरी वस्तू त्या   E-commerce website वरून खरेदी केली तर तुम्हाला त्याचे Commission मिळते. प्रत्येक Product च्या Category साठी वेगवेगळे Commision असते. अशा प्रकारे तुम्ही चांगले पैसे कमावू शकता.

 

7) Promoting your own Product or Service. ( आपल्या वस्तूंची सेवांची जाहिरात )

    जर तुमचा स्वतःचा एखादा Business असेल तर तुम्ही तुमचे Product किंवा Service चे Promotion तुमच्या Youtube Channel वर करू शकता. या प्रकारामध्ये Youtube कडून तुम्हाला कोणत्याही प्रकारे पैसे मिळणार नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आपण आपल्या व्यवसायाचे प्रोमोशन करणार आहोत त्यामुळे Youtube ला कोणत्याही प्रकारे फायदा होणार नाही.


    या प्रोमोशन च्या माध्यमातून आपला business वाढणार आहे कारण आपण इथे मोफत आपल्या वयवसायाची जाहिरात करणार आहोत आणि हि जाहिरात बघून जे काही ग्राहक आपल्याकडून Product किंवा Service घेणार आहेत हा आपला Indirect झालेला फायदाच आहे.

Youtube Channel कसा सुरु करायचा ( How to Create a YouTube Channel )

Youtube च्या माध्यमातून ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले एक Youtube Channel तयार करावे लागेल. Youtube Channel तयार करण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत.

Note : आपण आपल्या Mobile किंवा Computer / Laptop मध्ये Youtube Channel तयार करू शकता.

१) सर्वात आधी Youtube Channel तयार करण्यासाठी आपल्याकडे Gmail Account असणे गरजेचे आहे.

२) Gmail Account नसेल तर आधी Gmail Account तयार करा.

३) नंतर Youtube ओपन करून त्यामध्ये आपला Gmail ID आणि Password वापरून Sign In करा.

४) Sign In केल्यानंतर तुमच्या Sreen च्या वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात  तुमच्या Profile Picture वर क्लिक करा.

५) तिथे तुम्हाला एक Drop Down Menu दिसेल, त्यामध्ये Create a new Channel वर Click करा.

६) नंतर तुम्हाला तुमच्या Channel चे नाव type करायचे आहे.

 

अशा प्रकारे तुम्ही  तुमचे Youtube Channel सुरु करू शकता.

 

पूर्ण Detail मध्ये Youtube Channel कसा सुरु करायचा हे जाणून घेण्यासाठी हा Video बघा.


Related Articles: 

टिप्पण्या