- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि त्याचे फायदे : What is Digital Marketing and Benefits of Digital Marketing
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डिजिटल मार्केटिंग काय आहे आणि त्याचे फायदे : What is Digital Marketing and Benefits of Digital Marketing
डिजिटल मार्केटिंग हा मार्केटिंग चा एक असा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये सर्व डिजिटल वस्तूंचा वापर करून जसे, इंटरनेट, सोशिअल मीडिया, मोबाईल एप्स इत्यादींचा वापर करून आपले प्रोडक्ट किंवा सेवा यांचा प्रचार आणि प्रसार डिजिटल माध्यमांवर केला जातो.
एका सर्वेक्षणात असं
आढळून आले आहे कि जेंव्हा एखाद्या ग्राहकाला एखादी वस्तू खरेदी करायची असेल तेंव्हा
४८% ग्राहक Google वर जाऊन त्या वस्तूचा तपास करतात, ३३% ग्राहक त्या कंपनीच्या वेबसाईटला
भेट देतात, तर २६% ग्राहक मोबाइल एप्लिकेशन वर त्या वस्तूची चौकशी करतात.

डिजिटल मार्केटिंगचे प्रकार : Methods of Digital Marketing
१) सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन : Search Engine Optimisation (SEO)

२) सोशियल मीडिया मार्केटिंग : Social Media Marketing

फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम,
टिकटॉक, माय स्पेस, लिंक्डइन, आणि स्नॅपचॅट सारख्या सोशियल मीडियाच्या प्लॅटफॉर्म वर
आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस ची जाहिरात करून आपण लाखो लोकांपर्यंत सहजपणे पोहचू
शकतो.
३) ई-मेल मार्केटिंग : Email Marketing

या मध्ये आपण ई-मेल
चा वापर करून आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग करू शकतो. आपण आपल्या ग्राहकांना वेळोवेळी
नवीन ऑफर, नवीन प्रॉडक्ट, डिस्काउंट, इत्यादी. अश्या प्रकारचे ई-मेल पाठवून आपल्या
प्रॉडक्ट चे मार्केटिंग करू शकतो आणि त्यांच्याशी रिलेशन वाढून कायम आपल्या कंपनी बरोबर
जोडून ठेवता येऊ शकते.
४) यु ट्यूब चॅनल : Youtube Channel
यु ट्यूब हे सर्वात
मोठे विडिओ सर्च इंजिन आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यु ट्यूब आपले स्वतःचे
चॅनेल सुरु करणे अगदी सोपे आणि मोफत आहे. यु ट्यूब च्या माध्यमातून आपण आपल्या प्रॉडक्ट
किंवा सर्व्हिस विषयीचे विडिओ बनवून आपल्या वस्तूंची जाहिरात करू शकतो. यु ट्यूब वर
आपले ग्राहक आपला विडिओ बघून त्याच्यावर कंमेंट्स च्या माध्यमातून त्यांची प्रतिक्रिया
पण देऊ शकतात. विडिओच्या माध्यमातून आपले प्रॉडक्ट लाखो लोकांपर्यंत पोहचवण्याचा एक
सोपा आणि लोकप्रिय मार्ग आहे.
५) कन्टेन्ट मार्केटिंग : Content Marketing
फक्त आपल्या वेबसाइटवर
किंवा आपल्या ब्लॉगवरच नव्हे तर कोणत्याही मीडिया वर आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस
संबंधी महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे यालाच कन्टेन्ट मार्केटिंग म्हणतात. या
प्रकारामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूंची जाहिरात केली जाते.
६) एफिलिएट मार्केटिंग : Affiliate Marketing
जेंव्हा इतर वेबसाइट
ओनर, ब्लॉग ओनर, मोबाईल एप्स ओनर त्यांच्या डिजिटल मीडिया वर आपल्या प्रॉडक्ट्स चे
प्रोमोशन करतात त्याला एफिलिएट मार्केटिंग म्हणतात. या मध्ये आपल्या प्रॉडक्ट्स चे
लिंक त्यांच्या डिजिटल मीडिया वर दाखवतात आणि त्या लिंक वर जाऊन कोणी आपले प्रॉडक्ट
खरेदी केले की त्यांना त्याचे कमिशन दिले जाते.
मार्केटमध्ये बऱ्याच
ई-कॉमर्स वेबसाइट आहेत ज्या एफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, ऍमेझॉन आणि
फ्लिपकार्ट ह्या दोन वेबसाइट त्याचे उदाहरण आहेत.
७) पे पर क्लिक : Pay Per Click (PPC Marketing)
जेंव्हा आपण सर्च इंजिन
च्या माध्यमातून आपल्या प्रॉडक्टची जाहिरात करतो तेंव्हा आपली जाहिरात सर्च इंजिनच्या
रिजल्ट पेज वर दाखवली जाते. प्रत्येक जाहिरातीसाठी त्या कंपनीला आधी पैसे द्यावे लागतात.
पण या पद्धतीमध्ये आपल्या जाहिरातींवरती जेंव्हा एखादा व्यक्ती क्लीक करेल तेंव्हाच
आपले पैसे कट होतात. जेंव्हा तो व्यक्ती आपल्या जाहिरातीवर क्लिक करतो तेव्हा तो आपल्या
वेबसाइट वर रीडायरेक्ट होतो.
या प्रकारामध्ये आपली
जाहिरात किती लोक्काना दिसली यावर आपले पैसे कट होत नाहीत तर आपल्या जाहिरातीवर किती
लोक्कांनी क्लिक केले यावर आपले पैसे कट होतात. आणि म्हणूनच या प्रकाराला पे पर क्लिक
मार्केटिंग असे म्हटले जाते.
हा प्रकार कंपन्यांना
खूप फायदेशीर आहे कारण आपल्याला फक्त तेवढ्याच जाहिरातीसाठी पैसे खर्च करावे लागतात
ज्यांनी आपल्या वेबसाइट वर लोक्कांना पाठवलेले असते.
८) मोबाईल एप्स मार्केटिंग : Mobile Apps Marketing
आजचे युग हे मोबाइलचे
युग आहे. दिवसेंदिवस मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. आज खूप कमी लोकं आहेत
जे मोबाईल वापरत नाहीत. त्यामुळे बर्याचश्या कंपन्या आपल्या प्रॉडक्टची जाहिरात मोबाईल
वर करण्यासाठी उत्सुक असतात. मोबाइलला वर जाहिरात करण्यासाठी मोबाइल अँप्लिकेशन हा
सगळ्यात चांगला मार्ग आहे. या मध्ये बऱ्याच प्रकारचे एप्स असतात.
डिजिटल मार्केटिंगचे फायदे : Advantages of Digital Marketing
डिजिटल मार्केटींगचा
मुख्य फायदा असा आहे की आपल्या टार्गेटेड कस्टमरपर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात पोहचता
येते. ग्राहकांचा आपल्या ब्रँड वरचा वाढता विश्वास आणि ऑनलाइन विक्री मध्ये वाढ हे
ही डिजिटल मार्केटिंगचे फायदे आहेत. डिजिटल मार्केटिंगचे अजून बरेच फायदे आहेत, या
सगळ्यांची आपण सविस्तर माहिती घेऊयात.
1) कमी खर्च : Digital marketing is Cost Effective.
कोणत्याही व्यवसायामध्ये,
प्रॉडक्ट किंवा सेवेच्या मार्केटिंग आणि जाहिरातींचा लागणारा खर्च हा व्यावसायिकांना
सोसावा लागणारा सर्वात मोठा आर्थिक भार आहे. मोठ्या व्यवसायांना त्यांच्या मार्केटिंग
आणि जाहिरातींसाठी लाखो रुपये मोजायला फारशी अडचण नसली तरी, लहान व्यवसायांसाठी ही
न परवडणारी गोष्ट असू शकते. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मार्केटींग करणे हे पारंपारिक
मार्केटींग पद्धतीस अधिक परवडणारा पर्याय प्रदान करते. आणि तितकाच प्रभावीपणे पण कमी खर्चात.
डिजिटल मार्केटिंग
हा कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे.
अगदी थोड्या पैशांमध्ये
आपण ई-मेल मार्केटिंगला सबस्क्राईब करून आपण आपल्या ग्राहकांना आपण ई-मेल पाठवून आपल्या
प्रॉडक्टचे प्रोमोशन करू शकतो.
2) गुंतवणूकीवर प्रचंड परतावा : Digital Marketing gives you high return on Investment.
डिजिटल मार्केटिंगमध्ये
खूप कमी खर्चात आपण आपल्या टार्गेटेड कस्टमरपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो. त्यामुळे
या पद्धतीमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर पारंपरिक मार्केटिंगपेक्षा आपल्याला चांगला
परतावा मिळतो.
3) ट्रॅक करण्यायोग्य, मोजण्यायोग्य परिणाम : Digital Marketing is Trackable and Measurable.
वेब अनॅलिटीक्स आणि
इतर ऑनलाईन मेट्रिक साधनांचा उपयोग करून आपण आपल्या डिजिटल मार्केटिंगची पूर्ण माहिती
घेऊ शकतो. या साधनांचा वापर करून, आपले ग्राहक आपली वेबसाइट कशी, कधी वापरतात किंवा
आपल्या जाहिरातीस कसा प्रतिसाद देतात या सर्व गोष्टींबद्दल तपशीलवार माहिती आपण मिळवू
शकतो.
4) योग्य ग्राहकांपर्यंत पोहचणे : Digital Marketing allows you to target your customers.
पारंपारिक मार्केटिंग
पद्धतीमध्ये ठराविक लोकांना लक्ष्य करणे कठीण असते. पण डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण
आपले मार्केटिंगचे अभियान जास्तीजास्त प्रभावी होण्यासाठी आपण योग्य लोकांपर्यंत पोहचू
शकतो. आपले अभियान अश्या लोकांपर्यंत पोहचू शकतो ज्यांना आपल्या प्रॉडक्टमध्ये इंटरेस्ट
आहे, जे आपल्या कडून काहीतरी नवीन बघण्यासाठी आणि ऐकण्यासाठी तयार असतील.
5) वैयक्तिकरण : Digital Marketing can be customized.
जर तुमचा ग्राहक डेटाबेस
तुमच्या वेबसाईटशी लिंक असेल तर जेव्हा जेव्हा कोणी तुमच्या साइटला भेट देईल तेव्हा
तुम्ही त्यांना लक्षणीय ऑफर देऊन त्यांचे अभिवादन करू शकता. या पद्धतीमध्ये आपण आपल्या
ग्राहकांची आवड निवड तपासून आपण आपल्या प्रत्येक ग्राहकाच्या गरजेनुसार आपण त्यांच्यांशी
संवाद साधून त्यांच्याशी व्यवहार करू शकतो. पारंपरिक मार्केटिंग पद्धतीमध्ये आपल्याला
हा ऑपशन मिळत नाही.
6) रिअल टाइम ऑप्टिमायझेशन : Real Time Optimisation in Digital Marketing
डिजिटल मार्केटिंग
मध्ये आपण रिअल टाइम मध्ये आपल्या जाहिरातीमध्ये हवे असलेले योग्य बदल करू शकतो. रिअल
टाइम मध्ये म्हणजे जर आपली जाहिरातीची कॅम्पेन चालू असताना जर आपल्याला असे वाटले कि
हि कॅम्पेन तेवढी प्रभावी नाही, तर आपण आपल्या जाहिरातीच्या कॅम्पेन मध्ये कधीही बदल
करू शकतो. हि गोष्ट पारंपरिक मार्केटिंग मध्ये श्यक्य नाही.
निष्कर्ष :
Conclusion
आजच्या या जगामध्ये डिजिटल माध्यमांचा वापर वाढत
आहे ज्यामुळे आपल्याला जर आपला व्यवसाय वाढवायचा असेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये टिकायचे
असेल तर आपल्याला डिजिटल मार्केटिंगचा आधार घ्यावाच लागेल. आपण जर व्यावसायिक असाल
तर डिजिटल मार्केटिंगचा योग्य तो प्रकार निवडून त्याचा अभ्यास करून डिजिटल मार्केटिंग
सुरु करा.
तुमच्या डिजिटल मार्केटिंग
कॅम्पेनसाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्या, आणि आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला
कंमेंट करून नक्की सांगा.
तुम्हाला हे सुद्धा नक्की आवडेल.
How to make money on Youtube (Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात)
10 Low Investment Business Ideas inMarathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये
काय तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून आहात ? मग हे नक्की वाचा.
स्थान:
Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा