- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
13 Ways to Earn Online Money in Marathi : या १३ Online माध्यमातून तुम्ही घरीबसल्या चांगले पैसे कमावू शकता
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
13 Ways to Earn Online Money in Marathi :
या १३ Online माध्यमातून तुम्ही घरीबसल्या चांगले पैसे कमावू शकता
आज इंटरनेटने संपूर्ण जगाला जोडले आहे. यामुळे इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि इतर बर्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची निर्मिती झाली आहे.
जसजसे Internet Users ची संख्या वाढत चालली आहे, तसतसे त्याद्वारे तयार होणाऱ्या पैसे कमावण्याच्या संधीही वाढत आहेत. तर, आज आपण भारतात पैसे कमविण्याच्या अनेक मार्गांवर चर्चा करणार आहोत. जर आपण विद्यार्थी असाल आणि नियमितपणे थोडा वेळ देऊ शकत असाल तर आपण जलदरीत्या पैसे कमवू शकता.
जरी खाली सांगितलेले मार्गातून कमी किंवा विना गुंतवणुकीतून पैसे कमावता येऊ शकतात तरी ते जलद नाहीत. त्यासाठी काही महिन्यांसाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे.
चला तर मग बघुयात हे १३ कोणते माध्यम आहेत ज्याच्यातून आपण घरबसल्या आपल्या फावल्या वेळात Online पैसे कमावू शकतो.
1) फ्रीलान्सर : Freelancer
भारतात सुमारे 15 दशलक्ष
(15 million) फ्रीलांसर आहेत जे स्टार्ट-अपच्या
वाढीस लक्षणीय चालना देत आहेत.
डिजिटल पेमेंट्स प्लॅटफॉर्म PayPal ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, बहुतेक भारतीय फ्रीलान्सर सरासरी २० लाख रुपये वार्षिक कमाई करतात.या अहवालामध्ये सर्वेक्षणमधील 23 टक्के फ्रीलान्सर वर्षाकाठी 60 लाखांची कमाई करतात.
फ्रीलान्सर म्हणजे
एक self-employed व्यक्ती, जो स्वतंत्रपणे आपले काम करतो. जो कोणत्याही कंपनीला व व्यक्तीसाठी
बांधील नसतो. तो त्याच्या कामाचे मूल्य स्वतः ठरवतो. फ्रीलांसर सर्वसाधारणपणे तासवर किंवा दिवसावर त्यांच्या कामाचे शुल्क आकारतात आणि
ते त्यांच्या स्वत: च्या नावाखाली काम करत असल्यामुळे व्यवसाय म्हणून नोंदणी करणे आवश्यक
नसते.
जर तुम्हाला वेब डिझायनिंग
किंवा कंटेन्ट रायटिंग सारखा एखादा छंद किंवा सवय असेल तर फ्रीलांसिंग तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
फक्त फ्रीलांसर डॉट कॉम सारख्या साइट Join करा आणि आपली आवड निवडा.
तुमची फ्रीलान्झिंग
मधून होणारी कमाई तुमच्या क्षेत्रातील तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहे. तुमच्या कामाची
गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकेच तुमचे उत्पन्नही वाढेल.
फ्रीलान्सिंग चे फायदे.
१) आपण स्वतः बॉस आहात : You’re the Boss
याचा अर्थ असा की आपण कधी आणि कोठे काम करायचे ते आपण स्वतः ठरवू शकता. याव्यतिरिक्त, आपण कोणत्या projects वर काम करू इच्छिता हे देखील आपण निवडू शकता
२) आपण अधिक पैसे कमवू शकता : You Can Make More Money
आपल्याकडे कौशल्य असल्यास, आपण फ्रीलान्सिंग च्या माध्यमातून सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक पैसे कमावू शकता. काही अहवालात असे आढळले आहे की फ्रीलान्सर व्यक्तींनी सरासरी Full-Time कर्मचार्यापेक्षा 45% अधिक कमाई केली आहे.
३) काम आणि जीवनाचा ताळमेळ : Work-Life Balance
केवळ 29% स्वतंत्र कामगार कामगार आठवड्यात 40 तासांपेक्षा जास्त वेळेत काम करतात. फ्रीलांसरमध्ये अविश्वसनीय Work Life Balance असते.
४) सुखी आणि आरोग्यदायक जीवन : Happy and Healthier Life
एका अभ्यासातून असे
दिसून आले आहे की फ्रीलान्सर पारंपारिक कामगारांपेक्षा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या
सुदृढ आहेत.
बेस्ट फ्रीलान्सिंग सेक्टर : Best Freelancing Sectors.
Marketing : मार्केटिंग
Business Project
Management : बिजनेस प्रोजेक्ट मॅनेजमेंट
Web Development :
वेब डेव्हलपमेंट
Writing : लिखाण
Accounting
: अकॉउंटिंग
Insurance
Inspection : विमा तपासणी
Teaching/Tutoring
: शिक्षण
Social Media : सोशिअल
मीडिया
Graphic Design : ग्राफिक
डिसाईन
Administrative
Assistant : प्रशासकीय सहायक
2) आपली स्वतःची वेबसाइट तयार करणे. : Start your own Website.
2020 मध्ये,वेबसाइट
तयार करणे इतके सोपे झाले आहे की, जरी आपल्याला
वेब डेव्हलपमेंट, डिझाइन किंवा कोडींगबद्दल काहीही कळत नसेल तरी आपण एक छान
वेबसाइट तयार आणि डिझाइन करू शकतो.
आपण जर स्वत: साठी किंवा आपल्या व्यवसायासाठी वेबसाइट तयार करू इच्छित असाल तरीही आपण योग्य साधने आणि संसाधने वापरून सहजपणे ते करू शकता.
आपल्याला वेबसाइट तयार करण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत
१. डोमेन नेम :
Domain name
२. वेबसाइट होस्टिंग
: Website hosting
१. डोमेन नेम : Domain name
डोमेन नेम म्हणजे आपण जी वेबसाइट तयार करणार आहोत त्याचे नाव उदा. www.youtube.com हे Youtube चे डोमेन नेम आहे. थोडक्यात डोमेन नेम हा तुमच्या वेबसाइट चा पत्ता आहे जिथून इंटरनेट यूजर्स आपली वेबसाइट पाहू शकतात.
२. वेबसाइट होस्टिंग : Website hosting
वेबसाइट होस्टिंग किंवा
वेब होस्टिंग ही अशी सेवा आहे जी आपल्याला आपली वेबसाइटवर इंटरनेटवर पोस्ट करण्याची
मदत करते.
वेब होस्ट किंवा वेब होस्टिंग सेवा, इंटरनेटवर आपली वेबसाइट दिसण्याकरिता आवश्यक तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करते. या मध्ये आपली वेबसाइट एका विशिष्ठ कॉम्पुटरवर सेव केली जाते, त्याला सर्वर असे म्हटले जाते. जेंव्हा इंटरनेट यूजर्सना आपली वेब्सिते पाहायची असेल तेंव्हा त्यांना त्यांच्या ब्राऊजर मध्ये फक्त आपल्या वेबसाइट चे नाव किंवा डोमेन नेम टाईप करायचे आहे. आपल्या वेबसाइट चे नाव टाईप करताच त्यांचा कॉम्पुटर आपल्या वेबसाइट च्या सर्व्हरशी कनेक्ट होतो आणि त्यांच्या कॉम्पुटर स्क्रीनवर आपली वेबसाइट दिसते.
एकदा तुमची वेबसाइट सेवा देण्यास तयार झाल्यानंतर, Google Adsense साठी साइन अप करा, Google Adsense च्या माध्यमातून तुमच्या वेबसाइटवर तुमच्या वेबसाइटशी संबंधित जाहिराती दाखवल्या जातील. आणि जेंव्हा त्या जाहिरातींवर जेंव्हा आपले वेबसाइट यूजर्स क्लिक करतील तेव्हा आपल्याला पैसे कमविण्यास मदत होते. आपल्या वेबसाइटवर जितके जास्त Traffic असेल तितके जास्त उत्पन्न मिळण्याची शक्यता अधिक असेल.
3) अफिलिएट मार्केटिंग : Affiliate Marketing
अफिलिएट मार्केटिंग,
मार्केटिंग करण्याचा आणि पैसे कमावण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग आहे कारण या
साठी आपल्याला कोणतेही प्रॉडक्ट तयार करण्याची आणि विक्री करण्याची आवश्यकता नाही.
आपल्याला फक्त एक गोष्ट करण्याची गरज आहे ती म्हणजे खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात दुवा साधून द्यायचा आहे. आणि विक्री झाल्यावर आपले कमिशन घ्यायचे आहे.
जेंव्हा तुमच्याकडे
तुमची स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग असेल त्यावेळी तुम्ही तुमच्या वेबसाईट किंवा ब्लॉग
वर Amazon किंवा Flipkart सारख्या कंपनीच्या Products चे प्रोमोशन करू शकता.
त्याकरिता तुम्हाला
त्या कंपनीच्या वेबसाइट वर जाऊन त्यांचे Affiliate होण्यासाठी रेजिस्ट्रेशन करायचे
आहे. रेजिस्ट्रेशन अगदी मोफत आहे त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरायचे नाही.
एकदा तुम्ही त्यांचे
रेजिस्ट्रेशन केले की तुम्हाला त्यांच्या वेबसाइट वरच्या कोणताही प्रॉडक्ट सिलेक्ट
करायचा आहे ज्याचे तुम्हाला प्रोमोशन करायचे आहे. ती कंपनी तुम्हाला त्या प्रॉडक्ट
ची link देईल, ती link तुम्हाला तुमच्या website वर पेस्ट करायची आहे. असे केल्याने
त्या प्रॉडक्ट ची जाहिरात तुमच्या वेबसाइट वर दिसेल आणि जेंव्हा कोण त्या link वर क्लिक
करून तो प्रॉडक्ट खरेदी करेल तेंव्हा तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल.
4) सर्वे, सर्च आणि आढावा : Surveys, searches and reviews
ऑनलाईन सर्वेक्षण करून, ऑनलाइन सर्च करण्याकरिता आणि उत्पादनांवर आढावा (Review) लिहिण्यासाठी पैशाची ऑफर देणाऱ्या अनेक वेबसाइट्स आहेत.
काही कंपन्यामध्ये
क्रेडिट मिळविण्यासाठी एखाद्याच्या बँकेच्या तपशिलासह त्यांना विशिष्ट माहिती उघड करणे
आवश्यक आहे. म्हणूनच आपण हा मार्ग अत्यंत काळजीपूर्वक वापरला पाहिजे. त्यापैकी काही
प्रकल्पांवर काम करण्यापूर्वी आपल्याला त्यांच्याकडे नोंदणी करण्यास सांगू शकतात. अशा
प्रकल्पांमधील सर्वात महत्वाची लक्षणे म्हणजे पैसे देणार्या वेबसाइट्सपासून दूर रहाणे
जे खरंच खूप चांगले आहे असे दिसते. काळजी घ्या ..
5) भाषांतर : Language translating
तुम्हाला जर अनेक भाषांचे ज्ञान असेल तर तुम्ही खूप चांगले पैसे कमावू शकता. Internet वर अश्या बऱ्याच वेबसाइट आहेत ज्या भाषांतर करण्यासाठी चांगले पैसे ऑफर करतात. ज्यामध्ये एखादे Document आपल्याला एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करून द्यायचे असते. या मध्ये स्पॅनिश, फ्रेंच, अरब, जर्मन किंवा इंग्रजी भाषेचा समावेश होतो.
बर्याच लोकांसाठी
हे कार्य खूप वेळ खर्च करणारे ठरू शकते आणि म्हणूनच ते जगभरातून कोठूनही ऑनलाइन अनुवादकांची
नेमणूक करतात. Freelancer.in, Fiverr.com, worknhire.com, Upwork.com सारख्या बर्याच
वेबसाइट्स आपल्याला व्यावसायिक भाषांतरकार (Professional Translator) होण्यासाठी व्यासपीठ
उपलब्ध करुन देतात.
ज्यांना या भाषेचे
ज्ञान नाही किंवा ज्यांना त्यांचा Project पूर्ण करण्यासाठी वेळ नसतो, असे लोक अशा
प्लॅटफॉर्मवर आपले काम अपलोड करतात, आपल्याला अशा प्लॅटफॉर्मवर आपली नोंदणी करायची
आहे. आणि भाषांतर करून देण्यासाठी बोली लावायची आहे. ह्या कामासाठी प्रति शब्दासाठी
1 ते 5 रुपयांच्या रकमेत मोबदला मिळू शकतो. काही भाषांमध्ये हे 10 रुपयांपर्यंत जाऊ
शकते.
6) ऑनलाईन शिकवणी : Online tutoring
जर आपण एखाद्या विशिष्ट विषयात तज्ञ असाल तर आपण लोकांना त्या विषयाच्या ऑनलाईन शिकवणीद्वारे पैसे कमवू शकता. ऑनलाईन शिकवणी देशभरातील सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांसह ऑनलाईन कनेक्ट होण्याचे एक साधन प्रदान करते.
यासाठी आपल्याला Vedantu.com, MyPrivateTutor.com, BharatTutors.com, tutorindia.net या संकेतस्थळांवर प्रोफाइल बनवून ऑनलाईन शिक्षक म्हणून साइन अप करता येईल आणि तुम्हाला जे विषय शिकवायचे आहेत त्याची यादी द्यावी लागेल. त्याचबरोबर तुमचा अनुभव, तुमचे Qualification इ. इत्यादी yया गोष्टींचीही माहिती भरावी लागेल. काही प्लॅटफॉर्म ऑनलाईन शिक्षक म्हणून काम करण्यासाठी लवचिक व सोयीस्कर वेळ देऊ शकतात.
बरेच प्लॅटफॉर्म या प्रक्रियेचे अनुसरण करतात -
1. ते आपल्याला एक साधा
फॉर्म भरून अर्ज करण्यास सांगतात
2. त्यानंतर त्यांनी नेमलेल्या
तज्ञांना आपल्याला एक प्रात्यक्षिक द्यावे लागते.
3. एकदा निवडल्यानंतर,
दस्तऐवजीकरण आणि प्रोफाइल तयार केले जाईल,
4. त्यानंतर प्रशिक्षण
आणि वेबिनार.
5. एकदा आपण वेबिनारला
उपस्थित राहिला की आपल्याला एक शिक्षक म्हणून सूचीबद्ध केले जाईल
6. आणि त्यानंतर आपल्या
ऑनलाइन सत्रांचे आयोजन केले जाईल.
7. जे नवीन आहेत ते दर तासाला सुमारे 200 रुपये कमवू शकतात
8. आणि जसजसा आपला अनुभव
आणि कौशल्य वाढत जाईल आपण प्रति तास 500 रुपये पर्यंत पैसे कमावू शकतो.
7) सोशल मीडिया व्यवस्थापन : Social media management, strategy
मित्र आणि अनोळखी लोकांशी संवाद साधण्याव्यतिरिक्त, Facebook, Twitter, Instagram, आणि Snapchat सारख्या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर पैसे कमविण्याकरिता केला जाऊ शकतो. बऱ्याच कंपन्या आणि ब्रांड त्यांच्या उत्पादनांची लोकप्रियता वाढविण्यासाठी सोशल मीडिया रणनीतिकारांना (social media strategists) पैसे देतात.
आजच्या या स्पर्धेच्या युगात ऑनलाइन दर्शकांचे लक्ष
वेधून घेण्यासाठी , आणि पोस्ट्स, व्हिडिओ इत्यादि व्हायरल करून ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी,
सर्जनशीलता (creativity) खूप आवश्यक आहे.
आपल्याला जर आपल्या
customers ला आपल्या ब्रँड बरॊबर जोडून ठेवायचे असेल तर आपल्याला नियमितपणे पोस्ट करण्याची
आणि नियमितपणे आपल्या Followers शी संवाद साधण्याची आवश्यकता आहे.
८) वेब डिझायनिंग : Web designing
आज सर्व व्यवसायांसाठी
स्वतःची वेबसाइट असणे काळाची गरज बनली आहे. पण सर्व व्यवसाय मालक टेक जाणकार नसतात.
ज्यांना तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे, विशेषत: वेबसाइटशी संबंधित, असे लोक लहान व्यावसायिकांना त्यांचे स्वतःचे वेबसाइट तयार करून त्यातून पैसे कमविण्यास मदत करू शकतात. आणि त्यांना त्यांची वेबसाइट तयार करून देऊन तुम्हीही चांगले पैसे कमावू शकता.
वेबसाइट्स सेट अप करण्यासाठी कोडिंग आणि वेब डिझायनिंग हे आवश्यक घटक आहेत. फक्त वेबसाइट तयार करून देणे एवढेच नाही तर, पुढे वेबसाइटना देखरेखीची (Website Maintenance) आवश्यकता असते आणि वारंवार अपडेट्स (Updates) ची आवश्यकता असू शकते, यामुळे तुमच्या कमाईत अजून वाढ होऊ शकते.
9) कंटेन्ट रायटिंग : Content writing
आपल्याला इंटरनेट वर दिसणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वेबसाइट, ब्लॉग, आर्टिकल किंवा विडिओ साठी लागणारे लेख लिहिणे म्हणजे कंटेन्ट रायटिंग होय.
कंटेन्ट रायटिंग ही
शब्दाच्या रूपात कोणतीही गोष्ट व्यक्त करण्याची कला आहे जी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या
प्रेक्षकांना कृती करण्यासाठी किंवा कॉल करण्यासाठी किंवा कदाचित ज्ञान आणि माहितीच्या
फायद्यासाठी प्रभावित करते. थोडक्यात सांगायचे
झाल्यास कंटेन्ट रायटिंग क्लायंटद्वारे क्लायंटने निश्चित केलेल्या लक्ष्यांसाठी दिलेल्या
कोणत्याही विषयाबद्दल लिहिणे.
कंटेन्ट रायटिंगचा
प्राथमिक उद्देश म्हणजे तो विशिष्ट कंटेन्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवणे. कोणत्याही
कंटेन्टचे यश हे तो कंटेन्ट किती लोकांपर्यंत पोहोचतो किंवा किती प्रतिक्रिया मिळतात
यावरुन परिभाषित केले जाते.
10) ब्लॉगिंग : Blogging
बऱ्याच ब्लॉगर्सने ब्लॉगिंग त्यांच्या छंदामुळे सुरु केले होते पण जसजसा त्यांचा ब्लॉग वाढत गेला त्यांनी ब्लॉगिंग त्यांचे करियर ऑप्शन म्हणून निवडले. आज फुल टाइम ब्लॉगर्स ची संख्या प्रचंड आहे.
ब्लॉगिंग सुरु करण्याचे दोन मार्ग आहेत.
पहिला म्हणजे फ्री
मध्ये तुम्ही Wordpress किंवा Blogger मधून तुमचा ब्लॉग सुरु करू शकता
आणि दुसरा म्हणजे self-hosted blog ज्यामध्ये तुम्हाला थोडे पैसे गुंतवावे लागतात
जर तुम्ही
self-hosted blog सुरु केलात तर तुम्हाला डोमेन नेम आणि सर्वर होस्टिंग विकत घ्यावे
लागेल. त्यासाठी तुम्हाला साधारणपणे वर्षाला ३००० ते ५००० रुपयांपर्यंत पैसे खर्च येईल.
पण या मध्ये तुम्ही बरेच प्लगिन्स आणि एलेमेंट्स चा वापर करून तुम्ही तुमच्या इच्छे
प्रमाणे तुमची वेबसाइट डिजाईन करू शकता.
पण जर तुम्ही फ्री मध्ये ब्लॉग सुरु केलात तर तुम्हाला तुमच्या सर्विस प्रोव्हायडर कडून जेवढे फ्री टूल्स दिले आहे फक्त तेच वापरण्याची मुभा असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छे प्रमाणे ब्लॉग डिजाईन नाही करू शकत.
जेंव्हा तुम्ही तुमचा
ब्लॉग सुरु कराल तेंव्हा तुम्ही तुमच्या ब्लॉग वर Adsense, Affiliate Marketing आणि
इतर माध्यमातून जाहिराती दाखवून पैसे कमावू शकता.
परंतु लक्षात ठेवा ब्लॉगिंगद्वारे मिळविण्यास देखील बराच वेळ आणि मेहनत लागू
शकतो. काही लोकांसाठी, ब्लॉगिंगद्वारे प्रत्यक्षात कमविण्यास वर्ष लागू शकते.
11) यु ट्यूब : YouTube
जर तुम्हाला तुमचे
विचार मांडण्यासाठी ब्लॉग सुरु करणे किंवा लिखाण करण्यास काही अडचण वाटत असेल तर तुम्ही
Video चा Option try करू शकता.
तुम्ही तुमचा एक
Youtube channel सुरु करून त्यावर तुमचे video Upload करू शकता. त्यानंतर ते
Videos monetize करून तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. तुम्ही तुमच्या Videos साठी तुमच्या
आवडीचा आणि तुम्हाला ज्या विषयाचे चांगले ज्ञान आहे असा एखादा Topic निवडा आणि त्या
विषयांवर चांगले videos बनवा. आणि हे Videos तुमच्या Youtube Channel वर Upload करा.
Youtube Channel सुरु
करण्यासाठी आपल्याला कोणताही खर्च नाही. तुम्ही Free मध्ये तुमचे Youtube Channel सुरु
करू शकता. त्यानंतर जरी तुमच्याकडे चांगला Camera नसेल तरी चालेल. सुरुवातीला तुम्ही
तुमच्या Smartphone चा कॅमेरा वापरून सुद्धा Video बनवू शकता.
तुम्हाला फक्त असे
Videos बनवायचे आहेत जे लोकांना आवडतील. तुमचे व्हिडिओस असे हवेत ज्यामधून लोकांना
काहीतरी शिकता आले पाहिजे, त्यांना एखाद्या विषयाची चांगली माहिती मिळाली पाहिजे, किंवा
त्यांचे मनोरंजन तरी झाले पाहिजे
जसजसा तुमचा चॅनेल
लोकप्रिय बनेल आणि Subscribers ची संख्या वाढत जाईल तसतशी आपली कमाई करण्याची क्षमता
देखील वाढेल.
12) किंडल ईबुक : Kindle eBook
जर पुस्तके लिहिणे
आपल्या आवडीचे असेल तर तुम्ही तुमचे पुस्तक किंडल ईबुकच्या स्वरूपात पब्लिश करू शकता
आणि अमेझॉनवरील लाखो वाचकांपर्यंत पोहचवू शकता. प्रकाशनास 5 मिनिटांपेक्षा कमी वेळ
लागतो आणि आपले पुस्तक 24-28 तासांच्या आत जगभरातील किंडल स्टोअरवर दिसते. अमेरिका,
कॅनडा, ब्रिटेन, जर्मनी, भारत, फ्रान्स, इटली, स्पेन, जपान, ब्राझील, मेक्सिको, ऑस्ट्रेलिया
इत्यादीं देशांमधील ग्राहकांच्या खरेदीवर आपल्याला 70 टक्क्यांपर्यंत रॉयल्टी मिळू शकते.
एखादी व्यक्ती त्यांच्या
अधिकारांवर नियंत्रण ठेवू शकते आणि स्वत: किंमती ठरवू शकते आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये
कधीही बदल करू शकते. आपले पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आणि पैसे मिळविण्यासाठी
BooksFundr आणि Pblishing.com ही दोन इतर ठिकाणे आहेत.
13) आपल्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री : Selling your products online
आपण आपली उत्पादने ऑनलाइन विक्री करू इच्छित असल्यास आपण आपली स्वतःची वेबसाइट तयार करुन हे करू शकता. सध्या Online मार्केटमध्ये याकरिता बरीच स्पर्धा आहे आणि सध्या बर्याच वेबसाइट अस्तित्त्वात आहेत म्हणून, उत्पादनांच्या बाबतीत एक Niche तयार करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. किंवा Amazon, Flipkart सारखे Platform विक्रीसाठी वापरू शकता.
Affiliate Marketing च्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या उत्पादनांची विक्री करू शकता.
सारांश
तर मित्रानो हे आहेत
काही निवडक मार्ग ज्या माध्यमातून तुम्ही online पैसे कमावू शकता पण या व्यतिरिक्त
देखील अजून भरपूर मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही online घर बसल्या कमाई करू शकता.
तुमच्याकडे थोडा वेळ
असल्यास, कोणत्याही गोष्टीची आवड आणि थोडी creativity असल्यास, आपण ऑनलाइन उत्पन्नाचे
एक चांगले स्रोत तयार करू शकता.
BEST OF LUCK.
You may also Like
1.
10Low Investment Business Ideas in Marathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये
स्थान:
Maharashtra, India
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा