10 Low Investment Business Ideas in Marathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये

10 Low Investment Business Ideas in Marathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये 

Business करायचा आहे ? पण भांडवल खूप कमी आहे. कोणता Business करायचा काळत नाही. काळजी करू नका इथे आम्ही तुमच्यासाठी 10 Low Investment Business Ideas दिल्या आहेत जे Business तुम्ही कमी भांडवलामध्येसुद्धा सुरु करू शकता.


    खरंतर Buisness करण्यासाठी आपल्याकडे खूप भांडवल असलं पाहिजे हा एक गैरसमज आहे. मान्य आहे कि आपल्याला माहित असणारे खुपसारे Business असे आहेत ज्यांच्या साठी मोठे भांडवल लागते. पण मार्केट  मध्ये असे पण खूप सारे Business आहेत जे खूप कमी भांडवलामध्येपण आपण सुरु करू शकतो. बरेचसे असे पण Business आहेत ज्यांच्यासाठी भांडवलाची गरज पण नाही लागत , फक्त ते आपल्याला माहित नसतात. म्हणूनच आम्ही इथे कमी अथवा भांडवलाची गरज नसणारे कोणते व्यवसाय आपण सुरु करू शकतो याची  यादी आणि  थोडीशी माहिती दिली आहे. जेणेकरून ज्यांना Business सुरु करण्याची इच्छा आहे ज्यांच्याकडे कमी भांडवल आहे त्यांना मदत होईल.

1. सेंद्रिय फळे आणि भाजीपाला स्टोअर : Organic fruits and vegetable store

आत्ताच्या परिस्थितीमध्ये लोकं आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक झालेली आहेत. लोकांना हे कळून चुकलंय कि आपण जर चांगले अन्न खाल्ले तरच आपलं शरीर चांगलं राहणार आहे. त्यामुळे आजकाल सेंद्रिय फळे आणि पालेभाज्या यांची मागणी वाढत आहे.

सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याचा दर हा नेहमीच्या फळे आणि भाजीपाल्या पेक्षा जास्त असतो, कारण सेंद्रिय पद्धतीमध्ये केमिकलचा वापर केलेला नसतो.

  महाराष्ट्राचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये सेंद्रिय फळे आणि पालेभाज्यांचे उत्पन्न काढून ते बाजारामध्ये विकू शकता

आणि जर तुमच्याकडे शेतजमीन नसेल तर तुम्ही तुमच्या ओळखीच्या शेतकऱ्याला त्याची शेती करायला सांगून त्याच्याकडून तो मा विकत घेऊन तो तुम्ही विकू शकता.

2. रियल इस्टेट एजन्ट : Real Estate Agent

या व्यवसायामध्ये तुम्ही ज्यांना घर विकत किंवा भाड्याने घ्यायचे असेल त्यांना आणि ज्यांना त्यांचे घर विकायचे आहे किंवा भाडे तत्वावर द्यायचे आहे त्यांना मदत करून खूप चांगले पैसे कमवू शकता

या व्यवसायामध्ये खूप कमी भांडवलाची गरज असते. फक्त तुम्हाला या व्यवसायाबाबतच्या कायदेशीर बाबींची माहिती घेणे गरजेचे आहे. तुम्हाला हा व्यवसाय करण्यासाठी त्याचा परवाना घ्यावा लागेल. तुम्हाला तुमचा Business नोंदणीकृत करावा लागेल.

ह्या Business मध्ये तुम्हाला तुमची ओळख वाढवावी लागेल आणि तुमच्या परिसरामध्ये कोणाचे घर भाड्याने द्यायचे किंवा विकायचे असल्यास त्याची माहिती असणे गरजेचे आहे. 

Real Estate Business काय आहे. महत्व, आणि तो सुरु करून त्यात सफलता कशी मिळवायची. 

3. खानावळ/ टिफिन सेवा : Tiffin Service

बरेचसे लोकं जे आपल्या घरापासून दूर नोकरीच्या किंवा कामाच्या निमित्ताने असतात, त्यांना जेवणासाठी खाणावळीची गरज असते. हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या मुलं आणि मुलींसाठी पण खानावळीची गरज असते

अश्या लोकांसाठी तुम्ही तुमच्या घरीच खानावळ सुरु करू शकता किंवा त्यांना जेवणाचा डबा पोहचवू शकता.

या व्यवसायासाठी तुम्हाला खूप कमी भांडवलाची गरज आहे. फक्त तुम्हाला तुमच्या ऑर्डर प्रमाणे किराणा माल भरावा लागेल आणि रोज गरजेच्या भाज्या तुम्हाला घ्याव्या लागतील

सुरुवातीला जेंव्हा तुमच्याकडे कमी कस्टमर असतील तेव्हा तुम्ही स्वतः घरी स्वयंपाक करू शकता आणि जेंव्हा तुम्हचा बिसनेस वाढेल तेंव्हा तुम्ही तुमच्या  मदतीला एखादा आचारी सुद्धा ठेवू शकता.

4. शिवणकाम / टेलरिंग : Tailoring

जर तुम्हाला शिवणकामाची आवड असेल आणि तुम्हाला त्याचे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही तुमच्या घरी राहून टेलरिंगचा व्यवसाय सुरु करू शकता. जरी आजकाल खूप कमी लोक कपडे शिवून घेतात, तरी टेलरची गरज हि लागतेच

यामध्ये तुम्ही कपड्याचे अल्ट्रेशन, नवीन कपडे शिवणे, पडदे शिवणे, पिशवी शिवून विकणे असे बरीच कामे करू शकता.

ह्या व्यवसायासाठी तुमच्याकडे एक शिवणकामाचे मशीन आणि टेलरिंगचे ज्ञान असणे गरजेचे आहे. फक्त मशीनसाठी आणि शिवणकामासाठी लागणाऱ्या काही गोष्टींसाठी तुम्हाला खर्च करावा लागेल. आणि जर तुम्हाला त्याचे ज्ञान नसेल तर तुम्हाला शिवणकामाचा एखादा कोर्स करण्यासाठीच पैसे खर्च करावे लागतील.

5. शिकवणी / प्रशिक्षण सेवा : Tution / Coaching Classes

जर तुमच्याकडे एखाद्या विषयाचे चांगले ज्ञान असेल आणि तुम्हाला जर शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही त्या विषयाची शिकवणी सुरु करू शकता. आजकाल पहिली पासून मुलं शिकवणी / Tution लावतात. पहिली ते दहावी पर्यंत मुले Tution लावतातच पण नंतर कॉलेज मध्ये गेल्यानंतर पण मुलांना काही विषयांसाठी शिकवणीची म्हणजेच Coaching Class ची गरज लागते.

हा बिसेन्स पण तुम्ही खूप कमी भांडवलामध्ये सुरु करू शकता. हा बिसनेस तुम्ही तुमच्या घरी सुद्धा सुरु करू शकता किंवा तसे जमले नाही तर तुम्ही एखादी खोली किंवा एखादी रूम किंवा फ्लॅट भाड्याने घेऊन सुद्धा सुरु करू शकता. या मध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच आणि बोर्ड आणि गरज असल्यास प्रोजेक्टर वर खर्च करावा लागेल.

6. उन्हाळी उपवासाचे पदार्थ : Papad & Sago Fritters

उन्हाळी उपवासाचे पदार्थ यांना वर्षभर मागणी असते. त्यांची तयारी करणे अगदी सोपे आहे. त्यासाठी जास्त मनुष्यबळ लागत नाही.

 

आपल्याला हा व्यवसाय करण्यासाठी  योग्य पाककृती आणि मूलभूत उपकरणे ज्यामध्ये गॅस स्टोव्ह, लागणारी भांडी आणि पापड सुकण्यासाठी प्लास्टिकचा पेपर यांची आवश्यकता आहेआणि अर्थातच, या खाद्यपदार्थामध्ये जाणारे मूलभूत घटक जसे की पीठ, साबुदाणे आणि मसाले. आपल्याला कदाचित फूड ग्रेड प्लास्टिक रॅपर्स आणि सीलिंग मशीन देखील आवश्यक असतीलहे बाजारात बर्यापैकी कमी किंमतीत उपलब्ध आहेत.

घरी बनविलेले उन्हाळी उपवासाचे पदार्थ यांची बाजारामध्ये खूप मागणी आहे. हे पदार्थ तुम्ही रिटेल मध्ये सुद्धा विकू शकता किंवा दुकान, मॉल, आणि होलसेलर यांना सुद्धा विकू शकता.

7. चॉकलेट आणि केक मेकींग : Choclate and Cake making

चॉकलेट आणि केक हे तर  सगळ्यांनाच आवडतात आणि त्यांची मागणी कधीच कमी होत नाही. तुम्ही एकदा हे  बनवायला शिकलात कि तुम्ही याचे घरच्या घरी क्लासेस घेऊ शकता किंवा रिटेल मध्ये ऑर्डर प्रमाणे  चॉकलेट आणि केक विकू शकता. एखाद्या प्रदर्शनातही तुमचा स्टॉल लावू शकता.

आजकाल प्रत्येकाच्या वाढदिवसाला केक लागतोच. लोकांना वेगवेगळ्या आकारामध्ये आणि डिजाईन प्रमाणे केक हवा असतो. तसंच चॉकलेट्सच्या बाबतीतही आहे. त्यामुळे या गोष्टींना मार्केट मध्ये खुप मागणी आहे फक्त तुम्हाला कस्टमरच्या डिजाईन प्रमाणे केक डेकोरेट करता आला पाहिजे.

ह्या बिजनेससाठी तुम्हाला फक्त चॉकलेट आणि केकच्या साहित्यात गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स छोट्या दुकानांमध्ये किंवा मोठ्या दुकानातही विकण्यासाठी ठेवू शकता.

8. ब्यूटी पार्लर : Beauty Parlor

जर तुम्ही महिला असाल तर तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स करून तुमच्या घरी सुद्धा ब्यूटी पार्लर सुरु करू शकता. ब्युटी पार्लरचा कोर्स २ ते ४ महिन्याचा असतो आणि तो करायला जास्त पैसे पण लागत नाहीत.


हा बिसनेस सुरु करण्यासाठी खूप कमी भांडवल लागते. तुमच्याकडे एक मोठा आरसा, कस्टमरला बसण्यासाठी पार्लर चेअर, आणि मेकअप साठी लागणारे साहित्य असेल तरी तुम्ही हा Business सुरुवातीला करू शकता. जेंव्हा तुमचा बिसनेसचा चांगला जम बसेल तेंव्हा तुम्ही तुमचे पार्लर छान सेट करू शकता.

9. योगा क्लासेस : Yoga Classes

आजच्या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर योग एक चांगला आणि छान पर्याय आहे. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं.


सध्या करोनाचं संकट जगावर दबा धरुन बसलेलं असताना सर्वचजण नैसर्गिकरित्या तंदुरुस्त राहण्यावर भर देताना दिसत आहेत. या नैसर्गिक उपायांमध्ये सर्वात आधी योगासनांचे महत्व वाढले आहे. लोकं आपल्या स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक झालेली आहेत. त्यामुळे लोकं आता योगा करण्यावर आणि शिकण्यावर भर देत आहेत

या परिसथितीत जर तुमच्याकडे योगा चे चांगले ज्ञान असेल तर तुम्ही योगाचे क्लासेस सुरु करू शकता. आणि जर तुमच्याकडे योगाचे ज्ञान नसेल तर तुम्ही स्वतः आधी शिकून घेऊन त्याचा चांगला सराव करून लोकांना योग शिकवू शकता.

हा बिसनेस तुम्ही खूप कमी भांडवलामध्ये सुरु करू शकता. किंबहुना जर तुमच्याकडे योगाचे चांगले ज्ञान असेल आणि दुसऱ्यांना शिकवण्याची आवड असेल तर तुम्ही हा बिजनेस विना भांडवल गुंतवताही सुरु करू शकता. सुरुवातीला तुम्हाला तुमच्या योगा क्लासचे मार्केटिंगसाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील.

 

10. ऑनलाईन बिजनेस : Online Business

सध्याचे युग हे इंटरनेटचे युग आहे. त्यामुळे सध्या बरेचसे बिजनेस आपल्याला ऑनलाईन झालेले दिसतील. अशा परिस्थितीत ऑनलाइन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून व्यवसाय करणे फायद्याचे ठरणार आहे.

 

या बिजनेसच्या प्रकारामध्ये खूप संधींचा समावेश होतो. जसे

1. यु ट्यूब चॅनल : YouTube Channel


     या मध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे एक You Tube Channel बनवून त्या चॅनेल वर लोकांच्या माहितीसाठी, ज्ञानासाठी, किंवा त्यांच्या मनोरंजनासाठी व्हिडीओस बनवून पैसे कमवू शकता.

2. ब्लॉगिंग : Blogging / Online Blogger.


जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल आणि कोणत्याही गोष्टीचे परिपूर्ण व चांगले ज्ञान असेल तर तुम्ही तुमचा एक ब्लॉग तयार करून त्या विषयावर त्या ब्लॉग मध्ये लिहून सुद्धा पैसे कमावू शकता.

3. फ्रीलान्सिंग : Freelancing / Freelancer.


फ्रीलान्सर म्हणजे एक self-employed व्यक्ती जो स्वतंत्रपणे आपले काम करतो. जो कोणत्याही कंपनीला व व्यक्तीसाठी बांधील नाही. तो त्याच्या कामाचे मूल्य स्वतः ठरवतो.

इंटरनेट वर बराचश्या Freelancing Website आहेत तिथे जाऊन तुम्ही तुमच्याकडे असलेलं कौशल्य निवडून नाव नोंदणी करू शकता. तुमच्या कौशल्याशी निगडित कुणाचे काम असेल तर तो व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल. तुम्ही जर त्या व्यक्तीचे काम करण्यास तयार असाल तर तो व्यक्ती तुम्हाला त्या कामाचा परतावा देईल. हे सगळे काम ऑनलाईन केले जाऊ शकते.

 

4. एफिलिएट मार्केटिंग : Affiliate Marketing

 

Affiliate Marketing मध्ये तुम्ही तुमच्या Website वर Blog वर किंवा Youtube Channel वर Amazon किंवा Flipkart सारख्या Online Store चे प्रॉडक्ट्सच्या जाहिराती दाखवू शकता. त्या जाहिराती बघून आणि तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून जर कोणी त्या ऑनलाईन स्टोर मधून सामान खरेदी केले तर तुम्हाला त्याचे कमिशन मिळते.

5. एसईओ सेवा : SEO service

सध्या असंख्य ब्लॉग आणि website इंटरनेटवर  publish होत असतात. प्रत्येक blog व website  search engine वर Top ला दिसण्यासाठी धडपडत असतात. जर तुमच्याकडे या गोष्टीचे ज्ञान असेल तर तुम्ही हा बिजनेस सुरु करू शकता.

आणि नसेल र याचा थोडासा अभ्यास करून हा व्यवसाय आपण आपल्या कॉम्पुटर किंवा मोबाईलच्या आधारे सुद्धा करू शकता.

हा बिजनेस तुम्ही कोणत्याही भांडवलाशिवाय करू शकता. फक्त तुमच्याकडे SEO चे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.





टिप्पण्या