पैसे कमावून देणारे १० मोबाईल अँप्स 10 Best Money Earning Apps in Marathi

पैसे कमावून देणारे  १० मोबाईल अँप्स 

10 Best Money Earning Apps in India in Marathi

तुम्ही तुमच्या मोबाईलवर व्हाट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम सारखे सोशियल मीडिया अँप्स वापरत असाल, किंवा तुम्हाला मोबाइलवर गेम्स खेळायला आवडत असेल, तर तुम्ही यांच्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकता. विश्वास नाही बसत ? मग तुम्ही हा लेख नक्की वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि आपण आपल्या मोबाइलच्या माध्यमातूनही पैसे कमावू शकतो.



आज आम्ही तुम्हाला असे 10 मोबाईल अँप्स बद्दल माहिती सांगणार आहे ज्यांच्या माध्यमातून आपण पैसे कमावू शकतो.

1) मिषो - रिसेल्लिंग प्रॉडक्ट

एकही रुपया न खर्च करता तुम्ही तुमचा रेसेल्लिंग चा व्यवसाय तुमच्या मोबाईल च्या माध्यमातून करू शकता. मीशो हे भारतातील सर्वात लोकप्रिय रीसेलिंग App आहे. या मध्ये आपल्याला रिसेलर म्हणून रेजिस्ट्रेशन करायचे आहे. आणि त्यानंतर या App मध्ये असलेले असंख्य ब्रँडेड प्रॉडक्ट मधून तुम्हाला जे आवडेल किंवा तुमच्या मित्र मैत्रिनींना जे प्रॉडक्ट आवडेल अश्या प्रोडक्टचे, Whatsapp, Facebook, Instagram किंवा इतर सोशियल माध्यमांच्या साहाय्याने प्रोमोशन करायचे आहे. जेंव्हा तुम्ही प्रोमोशन केलेले प्रॉडक्ट एखाद्या व्यक्तीला आवडेल आणि तो व्यक्ती ते प्रॉडक्ट खरेदी करेल, त्यावर तुम्हाला त्याचे कमिशन मिळेल. 



तुम्ही जितके जास्त प्रोमोशन कराल आणि तुमच्या माध्यमातून जितक्या जास्त प्रॉडक्टची विक्री होईल तितका तुम्हाला फायदा होणार आहे. काही रिसेलर्स या App च्या माध्यमातून महिन्याला साधारण 25000 रुपये पर्यंत कमवत आहेत.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा. Install Meesho App

Meesho  बद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी इथे क्लीक करा : Meshoo App  ची सविस्तर माहिती 


2) गूगल ओपिनियन रिवॉर्ड्स

गूगलच्या सर्वात लोकप्रिय Apps पैकी हे एक App आहे. हे App फक्त Android Users साठी उपलबध्द आहे. यामध्ये Sign Up केल्यानंतर आपल्याला दर आठवड्याला साधारणपणे 20 ते 30 सर्वे करायला मिळतात. या सर्वे मध्ये विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला प्रामाणिकपणे आणि खरी उत्तरं द्यायची आहेत आणि आपले मत नोंदवायचे आहे. 



सर्वे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 0.1 सेन्ट ते 2 डॉलर पर्यंत  रिवॉर्ड मिळतो. पण हा रिवार्ड आपल्याला डायरेक्ट कॅश न मिळता पॉईंट च्या स्वरूपामध्ये मिळतात. हे पॉईंट्स आपण रिडिम करून आपण ते पॉईंट्स वापरून, Google Play Store वरून अँप्स, गेम्स, मुव्हीज, म्युसिक अल्बम, बुक्स (Android Apps, Games, Movies, Music Albums, Books) इत्यादी खरेदी करू शकतो.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Google Opinion Rewards

 

3) रोज धन 

Google Play Store वरून १ करोड पेक्षा जास्त लोकांनी हे App डाउनलोड केले आहे. हे एक खूप लोकप्रिय App आहे ज्यामधून आपण रोज आर्टिकल्स शेयर करून, गेम्स खेळून, सर्वे करून, किंवा रोज चेक-इन करून, खूप सारे पैसे कमावू शकतो.



जेंव्हा तुम्ही या App मध्ये पहिल्यांदा लॉगिन करता तेंव्हा तुम्हाला ५० रुपये मिळतात. ते पैसे तुम्ही तुमच्या Paytm Account मध्ये दोन दिवसांनी जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला रोज या अँप मध्ये चेक-इन करायचे आहे.

या शिवाय तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा कोणालाही हे App वापरण्यासाठी Invite केल्यास तुम्हाला पैसे मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला काही task दिले जातील ते task पूर्ण करून पण तुम्ही पैसे कमावू शकता.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा : Install Roz Dhan

 

4) लोको - खेळा आणि जिंका

जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर वेगवेगळे गेम्स खेळून पैसे कमवायचे असतील तर हे App खास तुमच्यासाठी आहे. या App मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाषेमध्ये जसे - हिंदी, मराठी, तमिळ, तेलगू आणि बंगाली भाषेमध्ये वेगवेगळे गेम्स खेळू शकता आणि चांगले पैसे कमावू शकता.



या App मध्ये असे पण काही गेम्स आहेत ज्याच्यामधून तुम्ही काहीतरी शिकू शकता व त्याचबरोबर पैसेपण कमावू शकता. असे काही गेम्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला काही सामान्य ज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत ज्यामुळे तुमचे सामान्य ज्ञानही वाढेल आणि तुम्ही पैसेही कमवाल.

या App मध्ये मिळालेले पैसे पैसे तुम्ही तुमच्या Paytm Wallet मध्ये ट्रान्स्फर करून वापरू शकता.

पण या App ची एक कमतरता आहे कि या App मध्ये तुम्ही ठराविक वेळेतच गेम्स खेळू शकता. तुम्हाला तुमच्या वेळेनुसार गेम्स खेळता येत नाहीत. आणि जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला ठराविक वेळातच सगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्यायची आहेत. दिलेल्या प्रश्नांपैकी एक जरी उत्तर चुकले तरी तुम्हाला पैसे नाही मिळणार म्हणून प्रत्येक प्रश्नांची बरोबर उत्तरं द्या आणि चांगले पैसे कमवा.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा : Install Loco

 

5) स्वॅगबक्स / एस बी आन्सर 

स्वॅगबक्स मध्ये तुम्ही वेगवेगळे Task पूर्ण करून पैसे कमावू शकता. हे App तुम्ही Online Web App “Swagbucks” म्हणून पण वापरू शकता किंवा तुमच्या मोबाईल मध्ये  "SB Answer – Surveys that Pay" Mobile App म्हणून पण वापरू शकता.



या मध्ये तुम्ही सर्वे करू शकता, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकता, गेम्स खेळू शकता, किंवा व्हिडिओस बघून पैसे कमावू शकता.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Swagbucks / SB Answer

 

6) टास्कबक्स

टास्कबक्स मध्ये आपल्याला ऑनलाइन सर्वे आणि दिलेले टास्क पूर्ण करायचे आहेत. हे अँप मुख्यतः भारत आणि भारतीय उपखंडातील रहिवाश्यांसाठी बनविले गेले आहे. हे अँप वापरण्यास खूप सोपे आहे. या मध्ये आपल्याला ऑनलाईन सर्वे करायला मिळतात, प्रॉडक्ट चे रिव्हिव लिहायला मिळतात किंवा अँप विषयीचे आपले अनुभव पण आपण लिहू शकतो. याव्यतिरिक्त अजून काही टास्क दिले जातात ते पूर्ण करून आपण पैसे कमावू शकतो.



आपल्याला ह्या अँप मध्ये जे पैसे मिळतात ते आपल्या Paytm Account मध्ये जमा होतोत. तिथून ते आपण ऑनलाईन शॉपिंग साठी, मोबाईल रिचार्ज करण्यासाठी व इतर कामासाठी वापरू शकतो.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Taskbucks

 

7) फोप

फोटोग्राफर ह्या App च्या माध्यमातून चांगले पैसे कमवू शकतात. यासाठी आपल्याकडे चांगला व महागडा कॅमेरा असायलाच पाहिजे असं नाही. आपण आपल्या स्मार्टफोन मधून सुद्धा फोटो काढून अपलोड करू शकतो पण चांगले दर्जेदार फोटो कसे काढायचे याचे ज्ञान आपल्याकडे पाहिजे.



या App मध्ये मिशन Mission म्हणून एक प्रकार आहे. ज्यामध्ये कंपनी आपल्याला सांगते की ते कोणत्या प्रकारच्या फोटोच्या शोधात आहेत. जर आपण ते मिशन घ्यायचे ठरवले आणि जर आपण अपलोड केलेला फोटो किंवा विडिओ त्या मिशन साठी सिलेक्ट झाला तर आपण शेकडो डॉलर्स जिंकू शकतो.

यासाठी आपल्याला त्या मिशन मध्ये सांगितलेल्या गोष्टींची पूर्तता करायची आहे आणि त्यांना ज्या प्रकारचे फोटो किंवा विडिओ पाहिजेत त्या प्रकारचे फोटो किंवा विडिओ अपलोड करायचे आहेत.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Foap App

 

8) नोट्सगेन

नोट्सगेन हे अँप विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला आठवत असेल कि आपण जेंव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये होतो तेंव्हा आपण प्रत्येक विषयांच्या नोट्स काढायचो किंवा आपण आपल्या वर्गामध्ये जो कोणी हुशार विद्यार्थी असायचा त्याचे नोट्स रेफेरेन्स साठी घ्यायचो. किंवा त्या विषयाचे शिक्षक आपल्याला त्यांच्या नोट्स देत असत. पण त्यावेळी असा प्रोबेलम व्हायचा कि त्या नोट्सला खूप मागणी असायची आणि प्रत्येकाला ती वेळेवर मिळत नसे.



आत्ता पण बरेच विद्यार्थी नोट्सवर आपला अभ्यास करतात. त्यांना हे अँप खूप मदत करेल. या अँप मध्ये प्रत्येक विषयाचे नोट्स आहेत जसे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय विज्ञान, कायदा, कला, व्यवस्थापन, आयएएस, चार्टर्ड अकाउंटन्सी, कंपनी सेक्रेटरी, अभियांत्रिकी प्रवेशासाठी जेईई इत्यादी. या सर्व विषयांच्या नोट्स तुम्ही या अँप वरून डाउनलोड करू शकता.

आता आपण बघुयात या अँपच्या माध्यमातून पैसे कसे कमावता येतात. तुम्ही जर विद्यार्थी किंवा शिक्षक असाल आणि तुम्हाला नोट्स काढायला आवडत असेल किंवा तुमच्याकडे कोणत्याही विषयांचे नोट्स असतील तर तुम्ही तुमच्या नोट्स या अँपवर अपलोड करू शकता व तुम्ही तुमच्या नोट्स ची किंमत ठरवू शकता. जर एखाद्या व्यक्तीला तुमच्या नोट्स खरेदी करायच्या असतील तर तो तुम्हाला तुम्ही ठरवलेली किंमत देऊन तो तुमच्या नोट्स खरेदी करेल आणि तुम्हाला पैसे मिळतील.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Notesgen 

 

9) स्क्वॅदरन

SquadRun हे एक असे अँप आहे ज्यामध्ये आपल्याला वेगवेगळे टास्क परफॉर्म करायचे आहेत. प्रत्येक टास्कला या अँप मध्ये " मिशन " म्हणतात. जेंव्हा आपले मिशन पूर्ण होते तेंव्हा काही ठराविक रक्कम ज्याला स्क्वॅडकॉईन्स Squadcoins म्हणतात ते आपल्या खात्यामध्ये जमा होतात. प्रत्येक मिशन मधून आपल्याला कीती  Squadcoins मिळणार हे त्या मिशन वर आणि त्याच्या लेव्हलवर अवलंबून असते. तसे बघायला गेले तर हे मिशन्स खूप सोपे असतात. फक्त तुम्हाला ते नीट समजून घ्यायला हवेत. आणि सांगितलेल्या सूचनांचे पालन करायला पाहिजे.



हे मिशन्स असे डिसाइन केलेले असतात कि आपण हे पूर्ण करताना बोर होणार नाही. आपल्याला असे वाटेल कि आपण एखादा खेळ खेळत आहोत. जर तुमच्याकडे थोडा वेळ आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईल वर टाईमपास करू इच्छिता तर तुम्हाला हे अँप नक्की आवडेल.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install SquadRun

 

10) क्युरेका

Qureka अँप मध्ये तुम्ही बुद्धीचे खेळ खेळून पैसे कमावू शकता. Qureka हे Daily Live Quiz Show आहे. या अँप मध्ये तुम्हाला दररोज सकाळी ९ वाजल्या पासून ते रात्रीच्या ९ वाजेपर्यंत खूप quiz आणि Brain Games खेळायला मिळतील. हे गेम्स इंग्लिश आणि हिंदी भाषेमध्ये दिले आहेत. Live Quiz मध्ये साधारणपणे १० प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला १० सेकंड वेळ दिलेला असतो. जितक्या जास्त प्रश्नांची उत्तरं आपण बरोबर देतो तितका आपला रँक वाढतो. आणि शेवटी बक्षिसाची रक्कम सगळ्या विजेत्यांमध्ये वाटली जाते. जर एखाद्या Quiz मध्ये कोणच विजेता झाले नाही तर बक्षिसाची रक्कम पुढच्या Quiz मध्ये ऍड केली जाते.



ह्या Quiz सोबतच दिवसातून काही वेळा Mini Quiz पण खेळायचा चान्स मिळतो. त्यामधून सुद्धा आपण पैसे कमावू शकतो. आपण जिंकलेली रक्कम आपण आपल्या Paytm Wallet मध्ये जमा करू शकतो.

Live Quiz सोबतच Hourly Quiz सुद्धा आपण खेळू शकतो आणि दिवसाला २०००० रूपांपर्यंत बक्षीस जिंकू शकतो. Hourly Quiz दिवसभर चालू असते ते तुम्ही कधीही खेळू शकता. Hourly Quiz साठी आपल्याला ९० सेकंदाचा वेळ मिळतो.

हे अँप वापरून आणि Quiz आणि गेम्स खेळून आपली बौद्धिक क्षमताहि वाढते आणि आपण पैसेही कमावू शकतो.

Install करण्यासाठी इथे क्लीक करा: Install Qureka


निष्कर्ष: Conclusion 

अशा आहे कि तुम्हाला हे आर्टिकल नक्की  आवडले असेल आणि तुम्हाला मोबाईल वापरून पैसे कमावता येतात याचीही माहिती मिळाली असेल. हे अँप आपल्याला रातोरात श्रीमंत तर करणार नाहीत पण मोबाईल वर तिमेपास करून किंवा खेळ खेळून आपण थोडे पैसे तर नक्की कमावू शकतो. जर तुम्हाला पण जर कोणते अँप माहित असेल ज्याच्यामधून आपण चांगले पैसे कमावू शकतो तर कंमेंट करून आम्हाला नक्की सांगा. हे आर्टिकल जर तुम्हाला आवडले तर Like  करा आणि आपल्या मित्रमैत्रिनींना आणि फॅमिली मेम्बर्सना नक्की शेयर करा. 

Related Posts : तुम्हाला हे सुद्धा नक्की आवडेल.

 How to make money on Youtube (Youtube च्या माध्यमातून कसे पैसे कमावता येऊ शकतात)

Things to remember before starting a Youtube Channel : (Youtube Channel सुरु करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा.)

10 Low Investment Business Ideas inMarathi - 10 जबरदस्त Business Ideas कमी भांडवलामध्ये

काय तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून आहात ? मग हे नक्की वाचा.


टिप्पण्या