काय तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून आहात ? मग हे नक्की वाचा.

काय तुम्ही फक्त तुमच्या नोकरीवर अवलंबून आहात ? मग हे नक्की वाचा.  

   शाळेत जायचं, खूप अभ्यास करायचा, चांगली नोकरी मिळवायची, आणि मग त्या नोकरीच्या पगारावर आपले सारे आयुष्य जगायचे. लहानपणापासून आपली मानसिकता अशीच झालेली असते. यात काही चुकीचे आहे असेही नाही.पण होतं काय आपण खूप प्रामाणिकपणे नोकरी करतो, कष्ट करतो, वेळ पडल्यास आपण ओव्हरटाईम करतो पण बऱ्याच वेळा आपली स्वप्नं तर सोडा पण आपल्या गरजा पण पूर्ण होत नाहीत. याचे कारण आहे आपण आपल्यासाठी उत्पन्नाचा फक्त एकच मार्ग निवडलेला असतो.त्यातही आपली काही चुकी नाही कारण लहानपणापासून आपण हेच बघत आलोय.

आपण फक्त नोकरीचाच विचार करतो. पण नोकरी करताना सुद्धा आपल्याला बराच वेळ मिळतो, पण त्या वेळेचा आपण सदुपयोग करत नाही. तो वेळ आपण टाइमपास करण्यात किंवा आपल्या मित्र मंडळीत गप्पा मारण्यात वाया घालवतो. जर ह्याच वेळेत आपण जर एखादा छोटासा व्यवसाय सुरु केला तर आपल्याला थोडे जास्त पैसे मिळतील असा आपण विचारच करत नाही. कारण आपल्याला आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडायचे नसते.

आपली मानसिकता अशी होण्याची करणे. अशी असू शकतील :

  • आपल्या घरात आणि आसपास व्यवसाय करणाऱ्या लोकांचा अभाव.
  • आपण लहानपणापासून जे काही शिक्षण घेत आलो ते नोकरीच्या दृष्टिकोनातून घेत आलो.
  • आपला सगळं आयुष्य " धंदा करणे आपले काम नाही " हे ऐकण्यात गेले.
  • आपल्याला रिस्क नको. कमी पैसे मिळाले तरी चालतील पण फिक्स इनकम पाहिजे.
  • जेवढे आहे त्यात समाधानी राहण्याची वृत्ती.
  • आपलीच काही लोकं आपल्याला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्या ऐवजी घाबरावतात.
  • कमी प्रतीचे किंवा कमी भांडवलामधले व्यवसाय करायची अनुत्सुकता किंवा न्यूनगंड .
  • आपल्याला आपल्या कंफर्ट झोन मधून बाहेर पडायचे नसते.
  • लोकं काय म्हणतील हा विचार
  • एखादा मोठा व्यवसाय करायला आपल्याकडे भांडवल नाही तर छोटा व्यवसाय करायची लाज वाटते.

 

एक्सट्रा इनकम Source ची का गरज आहे. आणि त्याचे फायदे. ( Why Extra Income Source and its Advantage )

  • आपण पैशांसाठी फक्त आपल्या नोकरीवर अवलंबून राहत नाही.
  • बऱ्याच वेळा काही लोकांचा पगार वेळेवर होत नाही, त्यामुळे त्यांना कोणाकडून तरी पैसे उसने घ्यावे लागतात. अशा वेळी एकाच इनकम स्रोत वर डिपेंड राहता जर इनकम चे जास्त स्ट्रॉत असतील तर आपल्याला कोणापुढे पैशांसाठी हात पसरायला लागणार नाहीत.
  • जरी कधी आपल्याला आपली नोकरी गमवावी लागलीच, तरी आपण कोलमडून जात नाही.
  • आपल्याला लहानपणी व्यवसायाचा महत्व कळालं नाही पण आपली मुलांना तरी त्याचे महत्व कळेल.
  • जर आत्ताच आपण एखादा छोटासा व्यवसाय चालू केला तर आपली मुलं मोठी होईपर्यंत तो व्यवसाय सेट झालेला असेल
  • आपल्या मुलांना नोकरी शोधण्याचे टेन्शन राहणार नाही. त्यांच्याकडे नोकरी किंवा व्यवसायाचा पर्याय असेल. त्यांना जे आवडेल ते ते करतील.
  • आपल्या पगारामधून महिन्याला जे सेविंग्स राहते ते बँकेत ठेवण्यापेक्षा एखाद्या व्यवसायात गुंतवले तर बँकेपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो.
  • रिटायर झाल्यावर हाच व्यवसाय आपल्या कमी येईल.
  • आपण बेरोजगार लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतो.
  • आपला मोकळा वेळ सत्कारणी लागेल नेगेटिव्ह वाईट विचार आपल्या डोक्यात शिरणार नाहीत.
  • व्यवसायामुळे आपली ओळख वाढेल. मित्रमंडळी वाढतील.

 

टिप्पण्या