- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
What is Real Estate and How to Start Real Estate Business रिअल इस्टेट उद्योग काय आहे, महत्व, आणि तो सुरु करून त्यात सफलता कशी मिळवायची.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
What is Real Estate and How to Start Real Estate Business रिअल इस्टेट उद्योग काय आहे, महत्व, आणि तो सुरु करून त्यात सफलता कशी मिळवायची.
Real Estate Business चा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम (Real Estate Business on Indian Economy) :
सध्या रिअल इस्टेट उद्योग सुमारे १२ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. . रिअल इस्टेट उद्योग भारतातील लोकांना रोजगार पुरवण्यामध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. तसेच भारताच्या GDP ला हातभार लावत आहे. सध्या रिअल इस्टेटचा भारताच्या GDP मध्ये 5% वाटा आहे; पुढील पाच वर्षांत तोच दर 6% पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
भारतातील रिअल इस्टेट उद्योग वेगाने वाढत चालला आहे. वर्षानुवर्षे इंडस्ट्रीजचा आलेख वाढत चालला आहे. या उद्योगाने दरवर्षी सुमारे 30% विकास दर दर्शविला आहे. अलीकडच्या काळातील Indian Outsourcing Service मध्ये झालेल्या वाढीमुळे रिअल इस्टेटमध्ये सुमारे 10 दशलक्ष चौरस फूट वाढीची नोंद झाली आहे. ज्यामध्ये टेक्निकल कन्सल्टन्सी सर्व्हिस , मेडिकल ट्रान्सक्रिप्शन, आणि कॉल सेंटर यांचा समावेश होतो.
रिअल इस्टेट बिजनेसचे चार मुख्य प्रकार आहेत. Categories / Types of Real Estate.
१. जमीन (Land)
२. निवासी मालमत्ता (Residential Properties)
३. व्यावसायिक मालमत्ता (Commercial Properties)
४. औद्योगिक मालमत्ता (Industrial Properties)
१. जमीन (Land)
जमीन या प्रकारामध्ये सामान्यत: अविकसित मालमत्ता (Undeveloped Properties) आणि रिक्त जमीन यांची नोंद होते.
२. निवासी मालमत्ता (Residential Properties)
एखादा व्यक्ती, त्याच्या कुटुंबासाठी किंवा माणसांच्या समूहाच्या निवासासाठी बांधण्यात आलेली घरे निवासी मालमत्ता या प्रकारामध्ये येतात. उदा. घर, फ्लॅट, अपार्टमेंट, रो हाऊस, बंगला, व इतर. हा रिअल इस्टेट बिजनेसचा सर्वात परिचित आणि सामान्य प्रकार आहे.
३. व्यावसायिक मालमत्ता (Commercial Properties)
ज्या वास्तूंचा व जागेचा व्यवसाय करण्यासाठी किंवा एखादे कामकाज करण्यासाठी केला जातो अशा मालमत्तेला व्यावसायिक मालमत्ता म्हटले जाते. उदा. दुकान, गाळा, ऑफिस, स्टोअर, शॉपिंग मॉल, हॉटेल हॉस्पिटल, मेडिकल आणि इतर.
४. औद्योगिक मालमत्ता (Industrial Properties)
औद्योगिक मालमत्ते मध्ये अशा जमीन आणि इमारतींचा समावेश होतो ज्यांचा उपयोग औद्योगिक व्यवसायांद्वारे कारखाने, यांत्रिक उत्पादन, संशोधन आणि विकास, बांधकाम, वाहतूक, लॉजिस्टिक्स आणि वेअरहाउसिंग यासारख्या कामासाठी केला जातो.
रिअल इस्टेट एजंट म्हणजे काय ? What does Real Estate Agent mean.
व्यवसाय सुरु करण्या पूर्वी आपल्याला आपण ज्या ठिकाणी हा व्यवसाय सुरु करणार आहोत त्या ठिकाणाची भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची माहिती असणे गरजेचे आहे. तसेच आपल्याला त्या एरिया मधील मालमत्ता खरेदी-विक्रीचे स्थानिक कायद्यांची माहिती असणे पण गरजेचे आहे.
रिअल इस्टेट एजंट हा मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दोन पक्षांमधील मध्यस्थ किंवा दलाल म्हणून कार्य करतो . मालमत्ता विकू इच्छिणाऱ्या व्यक्तीची मालमत्ता बाजारात आणणे आणि शक्य तितक्या चांगल्या किंमती आणि शर्तींसहित विक्री करणे, किंवा एखाद्या ग्राहकाच्या गरजा भागविण्यासाठी मालमत्ता शोधणे आणि सर्वात अनुकूल अटींसह शक्य त्या चांगल्या किंमतीवर खरेदी करणे हे कौशल्य रिअल इस्टेट एजंट्सकडे असणे गरजेचे आहे.आपण आपल्या क्लायंटशी निष्ठावान असाल आणि प्रामाणिकपणे काम केले तर हा एक चांगला व्यवसाय आहे.
रिअल इस्टेट एजंट बनण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडे कोणते गुण असायला हवेत ? Qualities needed to become a Real Estate Agent.
- तो एक उद्योजक व्यक्ती असायला हवा.
- तो साहसी, महत्वाकांक्षी, ठाम, बहिर्मुख, उत्साही, आत्मविश्वासी आणि आशावादी असला पाहिजे.
- तो एक प्रबळ व्यक्तिमत्व , मन वळविणारा आणि प्रेरक हवा.
- तो विवेकी आणि पुराणमतवादी असायला हवा.
रिअल इस्टेट व्यवसाय कसा सुरू कराल : Stpes to start Real Estate Business.
Step 1 : व्यवसायाचे संशोधन आणि मूल्यांकन Research and evaluate
कोणत्याही इतर व्यवसायाप्रमाणे हा व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ह्या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घ्या, त्याचे संशोधन करा. त्यासाठी या व्यवसायातील दिग्गजांचे या व्यवसायाबाबत काय मत आहे याची माहिती गोळा करा जमल्यास त्यांचे मार्गदर्शन घ्या. जी लोकं ह्या व्यवसायामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करत आहेत त्यांना भेटा, त्यांचे अनुभव ऐका, हि मानसं तुम्हाला या व्यवसायाचे फायदे तोटे व व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या आव्हानांची माहिती खूप चांगल्या प्रकारे सांगू शकतात.
हे न जमल्यास तुम्ही इंटरनेटवर या सर्व गोष्टींची माहिती मिळवू शकता. ह्या व्यवसायाशी निगडित पुस्तकं वाचा. आणि मग शेवटी सगळा अभ्यास करून झाल्यावर व ह्या व्यवसायाचे फायदे तोटे आणि आव्हानांवर विचार मंथन करून हा व्यवसाय करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घ्यावा.
Step 2 : आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार आपले क्षेत्र निवडा. Choose Your Category and Speciality.
वर सांगितल्या प्रमाणे, रिअल इस्टेट व्यवसायात पर्याय आहेत. आपण सुरुवातीला कोणत्याही एका प्रकारापासून सुरुवात करू शकता. एकतर व्यावसायिक औद्योगिक, निवासी किंवा जमीनच्या गुंतवणूकीत येऊ शकता. आपल्या पसंतीवर आणि उपलब्ध पर्यायांवर अवलंबून असलेले आपले ज्ञान व बजेट नुसार आपण आपले क्षेत्र निवडावे. सुरूवातीस, एका क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल आणि जसजसे आपण पुढे वाढत रहाल, तेव्हा आपण उर्वरित भागात लक्ष घालू शकता.
Step 3 : आवश्यक परवाने व नोंदणी मिळवा Obtain the required licenses and registration
पूर्वी बरेच रिअल इस्टेट एजन्ट या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नव्हते पण आत्ताच्या काळात रिअल इस्टेट क्षेत्रा मध्ये नवीन कायदे आले आहेत त्यानुसार आपल्याला आपल्या व्यवसायाची नोंदणी करणे, आवश्यक ते परवाने मिळवणे आणि कायदेशीर बाबींमध्ये परिपूर्ण राहणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. यामध्ये तुमच्या फर्मचे रेजिस्ट्रेशन करणे, सर्व्हिस टॅक्स रेजिस्ट्रेशन, रिअल इस्टेट एजन्टचे लायसन्स, जी.एस.टी रेजिस्ट्रेशन (G.S.T. Registration) मिळवणे आदी. अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.
आपण ज्या शहरामध्ये हा व्यवसाय सुरु करणार आहात तिथल्या कायदेशीर बाबींची पूर्ण आणि व्यवस्थित माहिती घेऊन त्या पूर्ण करून घ्याव्यात. या गोष्टींची पूर्तता केल्यामुळे तुम्ही तुमचा व्यवसाय पूर्णपणे प्रोफेशनली करू शकता व तुम्ही तुमच्या ग्राहकांचा विश्वास हि संपादन करू शकता. जेणेकरून तुम्हाला तुमचे काम करणारं कोणत्याही गोष्टींची अडचण येणार नाही.
आत्ताच्या रिअल इस्टेट इंडस्ट्री मध्ये तुम्हाला असा कोणताच प्रोफेशनल एजन्ट भेटणार नाही ज्याच्याकडे या सर्व कायदेशीर गोष्टींची पूर्तता नसेल. त्यामुळे या गोष्टी करणे खूप महत्वाचे आहे.
Step 4 : व्यवसायाची योजना तयार करा व लिहून काढा. Create Business Plan and Note it Down.
तपशीलवार Business Plan तयार करण्याचे अजिबात विसरू नका. आपल्या माहितीचा आणि ज्ञानाचा वापर करून आपली बिजनेस स्ट्रॅटेजि ठरावा आणि सुनिश्चित करा की आपण येणाऱ्या आव्हाने त्यांचे योग्य निवारण कसे केले जाईल. आपली व्यवसाय रचना, अर्थसंकल्प, निधी आणि आपली धोरणे या सर्व गोष्टींचा उल्लेख या ब्ल्यू प्रिंटमध्ये करावा. हे केल्याने नक्कीच आपण प्रत्येक क्षेत्रावर सुधारणा करू शकता. Business Planning आपल्या व्यवसायाच्या मार्गावर चालत असताना आपला हात धरुन नेण्यासाठी एक दिशा प्रदान करते.
Step 5 : एक उत्कृष्ट Team बनवा. Create a Good and Efficient Team
Step 6 : ऑनलाइन उपलब्ध व्हा : Go online
अशा प्रकारे आपण आपला बिजनेस सेट करू शकता. आता आपल्याला येणाऱ्या inquiry चे रूपांतर डीलमध्ये करायचे आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या ग्राहकांना चांगली सेवा द्या जेणेकरून ते ग्राहक समाधानी आणि खूष होतील. लक्षात ठेवा हेच ग्राहक त्यांच्या मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना आपली शिफारस करणार आहेत आणि आपला रिअल इस्टेटचा व्यवसाय भरभराटीला नेणार आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा