भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई मधील नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय Resigned at Bhaba Atomic Research Centre (BARC) Mumbai, to start Business.

भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई मधील नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय : Resigned at Bhaba Atomic Research Centre (BARC) Mumbai, to start Business.



आपल्या देशातील बरेच तरुण आपल्याला सरकारी नोकरी मिळावी यासाठी स्पर्धात्मक परीक्षेच्या तयारीसाठी खूप अभ्यास करत असतात. त्यातल्या काहीजणांना, पात्र होण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न करावा लागतो. काहीजणतर त्यांच्या इच्छित पदासाठी प्रयत्न करून थकले कि त्यांच्या पात्रतेपेक्षा खालच्या पदासाठी प्रयत्न सुरु करतात. त्यांचा फक्त एकच उद्देश असतो कि आपल्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे.

अश्या परिस्थितीमध्ये आपल्याला विश्वासही बसणार नाही कि आपल्या भारतामध्ये अशी काही लोकं आहेत ज्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून आपला स्वतःचा उद्योग सुरु केला आहे.

आज मी अश्याच एका व्यक्ती बद्दल तुम्हाला सांगणार आहे. ज्यांनी आपली भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई ( Bhaba Atomic Research Centre (BARC) Mumbai.) येथील चांगल्या पदाची नोकरी सोडून एक उद्योग सुरु केला. आणि आज त्यांचा उद्योग फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर हि अनेक देशांमध्ये पसरला आहे.

त्या व्यक्तीचं नाव आहे अरोक्यास्वामी वेलूमणी. थायरोकेयर टेक्नॉलॉजिस लिमिटेड ( Thyrocare Technologies Limited ) चे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

  • नाव : अरोक्यास्वामी वेलूमणी : Arokiaswamy Velumani                                                          Founder, Chairman and Managing Director of Thyrocare Technologies Ltd
  • जन्म : एप्रिल १९५९
  • जन्म ठिकाण : कोयंबटूर, तामिळ नाडू
सर्वात आधी आपण थायरोकेयर ( Thyrocare Technologies Ltd ) बद्दल जाणून घेऊयात 

Thyrocare काय आहे?

थायरोकेयर ही जगातील सर्वात मोठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रयोगशाळा आणि निदान केंद्र ( Preventive Healthcare Lab and Diagnostic Centre ) आहे. थायरोकेअर आज एका वर्षात  अब्ज अन्वेषणांवर प्रक्रिया करीत आहे आणि एका वर्षामध्ये  अब्ज प्रक्रिया करण्याची क्षमता आहे.गुणवत्ता आणि सर्वसामान्यांना परवडणारे शुल्क ही यांची ओळख आहे. थायरोकेयरचे मुख्य कार्यालय नवी मुंबई येथे आहे आणि भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर २००० हून अधिक शहरांमध्ये प्रयोगशाळा आहेत.

वेलूमणींचे सुरुवातीचे जीवन

अरोक्यास्वामी वेलूमणींचा जन्म एप्रिल १९५९ मध्ये तामिळनाडू मधील कोयंबटूर हद्दीतल्या एका खेड्यातल्या गरीब भूमिहीन शेतकर्‍याकडे झाला. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. त्यांच्या आईने त्यांच्याकडे असलेल्या म्हैशीचे दूध विकून महिन्याला साधारण २०० रुपये कमवून अरोक्यास्वामी आणि त्यांच्या तीन भावंडांचा सांभाळ केला. १० वर्ष त्या म्हैशीच्या दुधावर त्यांचे घर चालत होते. अरोक्यास्वामी सगळ्या भावंडांमध्ये मोठे होते, त्यांना दोन भाऊ व एक बहीण आहे.


शाळा व कॉलेज

अरोक्यास्वामींचे शालेय शिक्षण श्री वेंकटेश्वर हायस्कूल, अप्पाइकेनपट्टी पुडूर येथे झाले. पुढे कॉलेजच्या शिक्षणासाठी त्यांना त्यांचे गाव सोडावे लागले. १९७८ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठाशी संबंधित असलेल्या रामकृष्ण मिशन विद्यालयातुन केमिस्ट्री ( Chemistry ) या विषयातून बी.एससी ( B.Sc.) ची पदवी संपादन केली. 


खरंतर त्यांना कोयंबटूर मधल्या एका मोठ्या कंपनीमध्ये म्हणजेच “ साऊथ इंडिया विस्कॉस ” या रेयॉन बनविणाऱ्या कंपनीमध्ये नोकरी करायची होती, कारण ही कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या ४० % वार्षिक बोनस देत होती. या गोष्टीसाठी त्यांना त्या कंपनी मध्ये काम करण्याची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी B.Sc. साठी केमिस्ट्री विषय निवडला होता.

नोकरी

पदवी मिल्यानंतर त्यांनी साऊथ इंडिया विस्कॉस कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडे कामाचा अनुभव नसल्याने त्यांना तिथे नोकरी मिळू शकली नाही. त्यानंतर त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये इंटरव्हिव दिले पण सगळीकडे त्यांना अनुभव नाही या कारणाने नोकरी मिळाली नाही. आपल्याला अनुभव नसल्या कारणाने नोकरी मिळत नाही हि गोष्ट त्यांच्या मनाला खूप खटकली होती.

शेवटी १९७९ मध्ये त्यांना कोयंबटूर मधल्या एका कॅप्सूल तयार करणाऱ्या जेमिनी कॅप्सूल्स या कंपनीमध्ये मासिक १५० रुपयांची नोकरी मिळाली पण ती कंपनी सुद्धा चार वर्षांमध्ये बंद पडली आणि पुन्हा एकदा वेलूमणी यांना दुसरी नोकरी शोधावी लागली

त्यानंतर त्यांनी भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई ( Bhaba Atomic Research Centre (BARC) Mumbai.) येथे लॅबोरेटरी असिस्टंट ( Laboratory Assistant ) या पदासाठी अर्ज केला. अर्ज केल्यानंतर त्यांचा इंटरव्हिव झाला वैद्यकीय तपासणी झाली आणि १९८२ साली त्यांना भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई येथे नोकरी मिळाली. तिथे इंटरव्हिवला जाण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नव्हते, त्यांनी पैसे उधार घेऊन मुंबईला जाउन इंटरव्हिव दिला होता.

भाबा मध्ये सुरुवातीला त्यांचा मासिक पगार होतो ८८० रुपये. पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी काम करत करत शिकवणी घ्यायला सुरुवात केली. शिकवणी मधून त्यांना साधारण महिन्याला ८०० रुपये मिळू लागले. असे करून नोकरी आणि शिकवणी मिळून त्यांना महिन्याला सोळाशे ते सतराशे रुपये मिळत असत. त्यातले दर महिन्याला बाराशे रुपये ते त्यांच्या गावी आईला पाठवत असत. ते त्यांच्या आईला सांगायचे की त्यांना २००० रुपये पगार आहे कारण वेलूमणी म्हणतात जर मी आईला सांगितले असते कि मला ८८० रुपये पगार आहे तर त्यांच्या आईने त्यांना एवढ्या कमी पैशांसाठी इतक्या लांब पाठ्वलेच नसते.

विवाह व कौटुंबिक जीवन


त्यानंतर चार वर्षानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे लग्न सुमती यांच्याशी झाले. सुमती या स्टेट ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये काम करत होत्या. त्यानंतर चार वर्षानंतर वयाच्या २७ व्या वर्षी त्यांचे लग्न सुमती यांच्याशी झाले. सुमती या स्टेट ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये काम करत होत्या. १९८९ मध्ये त्यांना एक पुत्र रत्न प्राप्त झाले त्याचे नाव त्यांनी आनंद असे ठेवले. आणि १९९१ मध्ये त्यांना एक कन्या रत्न प्राप्त झाले तिचे नाव अमृता आहे.

वेलूमणी म्हणतात आज त्यांची फॅमिली ज्या स्तिथीमध्ये आहे त्याचे सारे श्रेय माझ्या पत्नीला म्हणजे सुमती यांना जाते. कारण त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरूनच त्यांनी त्यांच्या दोन्ही भावंडांना उच्च शिक्षणासाठी मुंबईला बोलावून घेतले आणि त्यांचे शिक्षण पूर्ण केले. त्यातील एक भाऊ आज त्यांच्या कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी ( chief financial officer ) आहेत. वेलूमणी असेही सांगतात कि मी जेंव्हा माझे पदव्युत्तर आणि डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण करत होतो त्यावेळी त्यांच्या पत्नीने त्यांच्या परिवाराकडे पूर्णपणे लक्ष दिले आणि परिवाराचा छान सांभाळ केला.

बी.ए.आर.सी. मध्ये काम करत असताना 

बीएआरसीमध्ये काम करत असताना त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि मुंबई विद्यापीठाकडे बीएआरसीच्या सहयोगी कार्यक्रमाद्वारे थायरॉईड बायोकेमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट पूर्ण केली. त्यामुळे त्यांची बढती झाली आणि त्यांना वैज्ञानिक हे पण मिळाले. त्यानंतर त्यांना मुंबईच्या परळ येथील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील बीएआरसी च्या रेडिएशन मेडिसिन सेंटर (आरएमसी) या विभागात तैनात करण्यात आले.

आता वेलूमणी यांना भाबा मध्ये नोकरीला सुरुवात करून १५ वर्षे झाली होती,त्यांनी त्यांच्या नोकरीमध्ये खूप परिश्रम घेतले होते आणि एका चांगल्या आणि मोठ्या पदापर्यंत पोहचले होते. पण त्यांच्या मनामध्ये एक विचित्र अस्वस्थता निर्माण येऊ लागली होती. या अस्वस्थेमुळेच त्यांनी १९९५ मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता, एवढेच नव्हे तर त्यांच्या पत्नीलाही न कळवता त्यांनी त्यांच्या भाबा एटॉमीक रिसर्च सेंटर, मुंबई मधल्या सरकारी नोकरीला राजीनामा दिला. आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. 

व्यवसायाची सुरुवात

त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच लोक आश्चर्यचकित झाले होते. कारण सरकारी नोकरी मिल्ने हे खूप कठीण काम आहे, आणि ती मिळालेली असताना आणि त्यामध्ये इतकी वर्ष काम करत चांगले पद असताना नोकरी सोडणे म्हणजे त्यांच्या परिवाराला आणि मित्रांसाठी एक धक्काच होता. वेलूमणी म्हणतात अश्या परिसथितीमध्ये सुद्धा माझ्या पत्नीने मला साथ दिली. व्यवसाय सुरु करायचा म्हणून सुमती यांनीही त्यांची स्टेट ऑफ इंडिया ची नोकरी सोडली आणि वेलूमणी यांना त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करायची ठरवली.

वेलूमणी सांगतात कि जेंव्हा आम्ही दोघे नोकरी करत होतो तेंव्हा आम्ही मिळून दरमहा १०,००० रुपये कमवत होतो. त्यातुन आम्ही दरमहा २,००० रुपये खर्च करायचो आणि ८००० रुपये वाचवायचो. आम्ही दोघांनी जेंव्हा नोकरी सोडली तेंव्हा आमच्या बचत खात्यात २.९० लाख रुपये होते. मला माहित होते की त्या पैशातून माझे कुटुंब पुढचे १०० महिने जगू शकेल.

आता वेलूमणी यांच्या समोर प्रश्न होता की व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे भांडवल कोठून आणायचे. म्हणून त्यांनी त्यांना मिळालेले प्रॉव्हिडंट फंडाचे एक लाख रुपये व्यवसायात गुंतवण्याचे ठरवले. आणि १९९६ मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसोबत मिळून त्यांचा व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला दक्षिण मुंबई येथील भायखळा मध्ये २०० स्क्वेर फुटाच्या एका छोट्याश्या गॅरेज मध्ये त्यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली. हि होती थायरोकेयर (Thyrocare) ची पहिली लॅब.

जेंव्हा त्यांनी लॅबची सुरुवात केली त्यावेळी त्यांनी त्यांचे पूर्ण लक्ष फक्त थायरॉईड तपासणी करण्यावर ठेवले. त्याकाळामध्ये सगळ्या थायरॉईड तपासणाऱ्या लॅब ची परिस्थिती चांगली नव्हती कारण तपासणीसाठी लागणारी मशीन खूप महाग होती आणि त्या मशीनच्या तपासणी करण्याच्या क्षमतेपेक्षा खूप कमी तपासण्या व्हायच्या. म्हणजे त्या एका मशीनची क्षमता दिवसाला ३०० तपासण्या करण्याची होती पण तपासणी करण्यासाठी त्या लॅब मध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी होती, त्यामुळे दिवसातून बऱ्याच वेळा ती मशीन बंद असायची. त्यामुळे लॅब वाले तपासणीसाठी जास्त रक्कम आकारत असे.

ही गोष्ट वेलूमणींच्या व्यावसायिक बुद्धीला लक्षात आली. त्यांनी अश्याच एका लॅबचा घेतला ज्याच्या मशीनला दिवसातून फक्त एक काम असायचे आणि राहिलेल्या वेळामध्ये ती फक्त उभी असायची. वेलूमणी यांनी त्या व्यक्तीला सांगितले कि तुम्ही मला तुमची मशीन भाड्याने द्या, त्या बदल्यात पुढील पाच वर्ष मी तुम्हाला मिळणाऱ्या तपासण्या मोफत करून देईन आणि तुम्हाला तुमच्या मशीनचे भाडे सुद्धा देईन. हे ऐकून तो वाक्यक्ति खुश झाला कारण त्याला ते मशीन साम्भाळायची गरज पडणार नव्हती आणि त्याच्याकडे येणाऱ्या सर्व तपासण्या त्याला मोफत मिळणार होते आणि वरून त्याला त्याच्या मशीनचे भाडे सुद्धा मिळणार होते. तो लगेच तयार झाला.

मग वेलूमणी यांनी ती मशीन आपल्या लॅब मध्ये आणून आपले काम सुरु केले. त्या मशीन ची दिवसाला साधारणपणे ३०० थायरॉईडच्या तपासणी करण्याची क्षमता होती. वेलूमणी त्या मशीनचा पुरेपूर वापर करत, ते एका दिवसामध्ये ५० तपासण्या त्या मशीन वाल्या व्यक्तीचे मोफत करून द्यायचे व स्वतः बाहेर फिरून हॉस्पिटल ला भेटून २५० तपासण्या स्वतःसाठी करायचे. त्यामुळे ते त्या मशीनच्या क्षमतेचा पुरेपूर करत असत. त्यामुळे वेलूमणी थायरॉईडची तपासणी अत्यंत कमी शुल्कामध्ये करून देत असत, त्यामुळे त्यांना भरपूर ऑर्डर मिळत गेल्या. त्यांचा कामाचा व्याप इतका वाढला कि त्यांना त्यांच्या लॅबसाठी मशीन ची संख्या वाढवावी लागली. अल्पकालातच त्यांनी त्यांच्या लॅब मध्ये १० मशीन उभ्या केल्या ज्यामधून ते दिवसाला जवळ जवळ ३००० तीन हजार तपासण्या करत असत.

वेलूमणी सांगतात ते स्वतः बाहेर फिरून इतर लॅब मधून आणि हॉस्पिटल मधून ऑर्डर घ्यायचो. बरेचसे लॅब आणि हॉस्पिटल त्यांच्याकडे तपासणी करण्यासाठी आम्हाला फोनवरून कळवत असत. ते जेंव्हा बाहेर असायचे तेंव्हा त्यांच्या पत्नी सुमती लॅब सांभाळत असत. सुरुवातीच्या काळामध्ये ते सॅम्पल गोळा करण्यासाठी ट्रेन ने प्रवास करत आणि स्टेशन पासून पुढे ते पायी चालत फिरायचे.

जसजसे त्यांचा व्यवसाय वाढत गेला त्यांनी त्यांच्या लॅब ची फ्रॅन्चायसी सुरु केली. १९९८मध्ये त्यांच्याकडे १५ कामगार काम करत होते आणि त्यांच्या कंपनीची उलाढाल १ कोठी रुपयांपर्यंत पोहचली होती.

त्यावेळी मार्केटमध्ये एका थायरॉईड तपासणीसाठी इतर लॅब ५०० रुपये आकारत होते तिथे थायरोकेयर च्या फ्रॅन्चायसी मध्ये २५० रुपयांमध्ये तपासणी केली जात होती. त्या २५० रुपया मधून १०० रुपये वेलूमणी ठेवायचे आणि १५० रुपये त्यांच्या फ्रॅन्चायसींना द्यायचे.

सुरुवातीला थायरोकेयर मध्ये फक्त थायरॉईड ची तपासणी व्हायची पण नंतर वेलूमणी यांनी इतर प्रकारच्या चाचण्या करण्यासही सुरुवात केली. पुढे त्यांच्या कामाचा व्याप इतका वाढला कि त्यांच्याकडे दिवसाला ५०००० पन्नास हजार चाचण्या होत होत्या. त्यातल्या ८०% चाचण्या ह्या थायरॉईड च्या असायच्या.

अल्पकाळातच त्यांच्या कंपनीने त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग यश मिळवले आणि बघता बघता त्यांचा व्यवसाय हा पूर्ण भारतात पसरला. भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये Thyrocare च्या Franchisee सुरु झाल्या. या सगळ्या शहरांमधून सॅम्पल मुंबईला Thyrocare च्या मुंबई मधील मुख्य शाखेत येते आणि तिथे त्याची तपासणी केली जाते.

Thyrocare चा हा यशाचा प्रवास असाच सुरु असताना ऑक्टोबर २०१५ मध्ये सुमति वेलुमानी यांचे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाले आणि १३ फेब्रुवारी २०१६ रोजी वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. वेलूमणींसाठी ही घटना खूप धक्कादायक होती कारण त्यांचे त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि त्यांच्या पत्नीने त्यांना आयुष्यभर त्यांच्या सुख दुःखात त्यांना साथ दिली होती.

आज वेलूमणी त्यांच्या दोन मुलांसोबत मुंबई येथे त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये राहतात. त्यांची दोन्ही मुलं ( एक मुलगा आणि एक मुलगी आनंद आणि अमृता ) त्यांना त्यांच्या कामामध्ये मदत करतात. वेलूमणी यांचे एक बंधूही त्यांच्या सोबत असतात.

तर अशी हि व्यक्ती जिने आपल्या जीवनाची सुरुवात इतक्या बिकट परिस्थितीमध्ये करून सुद्धा आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने, जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक आव्हानांवर आणि संकटांवर मात केली. आणि फक्त स्वतःचेच नाही तर अनेक लोकांचे जीवन घडवले आणि आज एका मोठ्या उंचीवर जाऊन पोहचले आहेत. तर असे हे अरोक्यास्वामी वेलूमणी सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.

Thyrocare ची आजची स्तिथी

थायरोकेयर आज एका वर्षात ३ अब्ज चाचण्या करीत आहे आणि एका वर्षामध्ये १० अब्ज चाचण्या करण्याची क्षमता आहे.
थायरोकेयर मध्ये १२०० हुन अधिक एम्प्लॉईज काम करत आहेत.
५००० पेक्षा जास्त फ्रॅन्चाइसी
२७० हुन अधिक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. Thyrocare Test Menu

टिप्पण्या